• Download App
    मन व शरीर दोन्ही तयार ठेवा|Keep both mind and body ready

    लाईफ स्किल्स : मन व शरीर दोन्ही तयार ठेवा

    दृश्याचे किंवा अदृश्य सूक्ष्म आत्म्याचे ज्ञान प्राप्त करून घ्यायचे असेल तर श्रवण करावे लागते. श्रवणासाठी मन व शरीर दोन्ही तयार लागतात. मनाची एकाग्रता व शरीराचे स्वास्थ्य दोन्ही लागते. या दोन्ही गोष्टी नसतील तर श्रवण नीट होत नाही. एकाग्र चित्ताने होणारे श्रवण व त्यावरील चिंतन परमार्थ साधना होते. श्रवण म्हणजे ऐकणे. मनन म्हणजे मनात धरणे. मनन म्हणजे धारणा. श्रवण व मननानेच सध्याचा ज्ञान व्यवहार चालला आहे हे नेहमी लक्षात ठेवा.Keep both mind and body ready

    उत्तम श्रवण घडण्यासाठी शरीर व मन तत्पर नसतील तर कोणत्या अडचणी येतात हे माहिती असू द्या. जेव्हा वक्ता बोलत असतो तेव्हा श्रोते रंगून जातात, एकाग्र होतात ,पण उशीरा येणारे श्रोते एकाग्रतेचा भंग करतात. शरीर आवरून श्रवणाला बसले तरी श्रवणात मन लागत नाही. दुसरेच विचार मनात येतात .

    एकामागून एक कल्पना येत असतात .जे जे काही आपण ऐकतो, त्याचे आपण मनन केले तरच निरुपणाने सार्थक झाले असे म्हणावे लागते. काही लोक श्रावणाला बसून आपापसात बोलतात .वक्त्याला कमीपणा देउन आपले श्रेष्ठत्व दाखविण्यासाठी विद्वान श्रोते बोलत राहतात. ह्या सर्व गोष्टींनी श्रवण साधत नाही. म्हणून आपले मन आपणच आवरायला हवे. कारण एकाग्र चित्ताने श्रवण आणि त्यावरील चिंतन हाच परमार्थ साधण्याचा राजमार्ग आहे. अर्थात हे उदाहरण जरी परमार्थाचे असले तरी नेहमीच्य जीवनातही ते लागू पडते.

    तुमंहा समोरच्या व्यक्तीचे नीट ऐकले तरच त्याचा फायदा होतो. वर्गात शिक्षम सिकवताना नीट ऐकले व मनन केले तर अभ्यास पटकन होतो. तसेच घरात किंवा कार्यालयात कोणी बोलत असेल ते जर योग्यप्रकारे लक्ष देवून ऐकले तर त्याचा फायदा झाल्याशिवाय रहात नाही. ऐकण्याकडे दुर्लक्ष केले तर त्याचा नक्कीच फटका बसण्याची शक्यता असते.

    Keep both mind and body ready

    Related posts

    काँग्रेसचे नेते कलमाडींना पुन्हा पक्षाच्या “सेवेत” आणू पाहताहेत, पण या नेत्यांनी गेल्या 15 वर्षांत पुण्यात केले काय??

    मोठी मंदिरे बांधताना ममता बॅनर्जी आणि जितेंद्र आव्हाड यांनी KCR यांचा सल्ला घेतला नाही का??

    Prakash Ambedkar भाजप पासून सावध राहायचा शिंदे + अजितदादांना प्रकाश आंबेडकरांचा सल्ला; पण खुद्द त्यांच्या वंचित आघाडीची अवस्था काय??