• Download App
    KANGANA RANAUT : तर आज कंगना झाली असती मॉब लिंचिंगची शिकार ! स्वतःला शेतकरी म्हणणार्‍या लोकांनी घेरले ; पोलीसांनी केली सुटका KANGANA RANAUT: ... then today Kangana would have been the victim of mob lynching; People who call themselves farmers surround Kangana; Police released him

    KANGANA RANAUT : तर आज कंगना झाली असती मॉब लिंचिंगची शिकार ! स्वतःला शेतकरी म्हणणार्‍या लोकांनी घेरले ; पोलीसांनी केली सुटका

    शुक्रवारी मनालीहून मुंबईला जात असताना शेतकऱ्यांनी किरतपूर साहिब टोल प्लाझा येथे कंगना राणौतच्या ताफ्याला घेराव घातला.


    अशा वेळी माझ्यासोबत सुरक्षा नसेल तर माझे काय होईल असा सवाल कंगनाने विचारला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी कंगना रानौतची गाडी आडवली. तिच्या गाडीला शेतकऱ्यांनी चहू बाजूनंनी घेरले होते. तसेच जोपर्यंत आमची माफी मागणार नाही, तोपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला होता. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर कंगनाला शेतकऱ्यांच्या गराड्यातून सुखरुप बाहेर काढण्यात आले.या सर्व घटनेचा व्हिडिओ कंगनाने शेअर केला आहे.कंगना म्हणाली माझ्याकडे सुरक्षा नसती तर आज मॉब लिंचिंगचा प्रकार झाला असता .KANGANA RANAUT: … then today Kangana would have been the victim of mob lynching; People who call themselves farmers surround Kangana; Police released him

    शेतकऱ्यांनी कंगनाला घेरले

    कंगना रनौत कारमधून पंजाबमधील चंदीगड-उणा महामार्गावरुन प्रवास करत होती. यावेळी येथील शेतकऱ्यांनी तिची कार थांबवत तिला घेरले. तसेच जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला.

    मात्र रस्त्यावर रहदारी वाढल्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत कंगनाला संरक्षण दिले. तसेच तिची कार शेतकऱ्यांच्या गराड्यातून मुक्त केली. हा सर्व प्रकार घडत असताना कंगना रनौतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर टीकेचे आसूड ओढले.

    … हे तर मॉब लिंचिंगसारखे आहे

    कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला आणि त्याला मॉब लिंचिंग म्हटले. कंगनाने लिहिले आहे की, पंजाबमध्ये पाऊल ठेवताच जमावाने हल्ला केला. ते शेतकरी असल्याचे सांगत आहेत. कंगना म्हणाली, ते मला शिव्या देत आहेत. सुरक्षा असतानाही माझ्यासोबत हे सर्व घडत आहे. पोलीस असूनही मला रोखले.

    जमाव मला माफी मागण्यास सांगत होता. मला येथून जाण्याची परवानगी नाही यावर विश्वास बसत नाही. माझ्यासोबत सार्वजनिक ठिकाणी मॉब लिंचिंग होत आहे. मी कोणताही नेता नाही आणि मी कोणताही पक्ष चालवत नाही.

    सुमारे तासभर कंगनाला घेराव 

    पंजाब पोलिसांनी कंगनाला सुरक्षा पुरवत शेतकऱ्यांना बाजूला केले आहे. कंगनाला कोणतीही इजा झालेली नसून ती सुरक्षितपणे शेतकऱ्यांच्या गराड्यातून बाहेर पडली आहे. तशी माहिती तिने इन्स्टाग्रामवर दिलीय. कंगनाने पंजाब पोलिसांचे आभार मानले आहेत.

    KANGANA RANAUT: … then today Kangana would have been the victim of mob lynching; People who call themselves farmers surround Kangana; Police released him

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!