Kangana Ranaut : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. यावेळी तिने स्वातंत्र्याबाबत बेताल वक्तव्य केले आहे, त्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका होत आहे. भाजप खासदार वरुण गांधी यांनीही कंगनावर निशाणा साधला आहे. स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केल्याचा आरोप करत ते म्हणाले, ‘त्यांच्या विचारसरणीला मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह? Kangana Ranaut Said india got true freedom in 2014 get trolled on social media varun gandhi slams
प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. यावेळी तिने स्वातंत्र्याबाबत बेताल वक्तव्य केले आहे, त्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका होत आहे. भाजप खासदार वरुण गांधी यांनीही कंगनावर निशाणा साधला आहे. स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केल्याचा आरोप करत ते म्हणाले, ‘त्यांच्या विचारसरणीला मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह?
अभिनेत्री कंगना राणावतचा एक व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना ती म्हणतेय की, १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही तर भीक मिळाली. कंगनाच्या मते खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले. कंगनाच्या या विधानावरून बराच गदारोळ झाला आहे. या बेताल वक्तव्यावर सर्वजण कंगनावर टीका करत आहेत. अलीकडेच कंगनाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
अभिनेत्रीच्या या बेताल वक्तव्यामुळे भाजप खासदार वरुण गांधीही चांगलेच संतापले आहेत. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘कधी महात्मा गांधींच्या त्याग आणि तपस्येचा अपमान, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान आणि आता शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखोंच्या बलिदानाचा. स्वातंत्र्य सैनिकांचा तिरस्कार. या विचारसरणीला मी वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?’
कंगना राणावतच्या या वक्तव्यानंतर लोकांच्या कमेंट्सचा ओघ सुरू झाला आहे. काहीजण तिला पुरस्कार मिळणे नौटंकी म्हणत आहेत, तर काहींनी हा देशाला स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. कंगनाच्या या वक्तव्यावरून अनेकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
निवृत्त आयएएस सूर्यप्रताप सिंह यांनी ट्विट केले आहे की, ‘प्रसिद्धी मिळाली तर सोनू सूद बन, कंगना नाही.’ त्याचवेळी युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी ट्विट करून लिहिले आहे की, अशा लोकांना पद्मश्री देणाऱ्या मोदी सरकारने उत्तर द्यावे. बलिदानातून मिळालेल्या ‘स्वातंत्र्याचे’ ७५ वे वर्ष आपण साजरे करत आहोत की तुमच्या भक्तांच्या मते ‘भिकेत मिळालेले स्वातंत्र्य’?’
Kangana Ranaut Said india got true freedom in 2014 get trolled on social media varun gandhi slams
महत्त्वाच्या बातम्या
- चारधाम प्रकल्पाबाबत सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका, केंद्र आणि स्वयंसेवी संस्थांना मंजुरीसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय सुचवण्याचे निर्देश
- सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची आयएसआयएस आणि बोको हराम बरोबर तुलना; राजकीय क्षेत्रात वादळ, तक्रार दाखल
- देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,091 रुग्ण आढळले, रिकव्हरी रेट 98.25 टक्क्यांवर
- फ्रान्समध्ये कोरोनाची 5वी लाट सुरू, सलग दुसऱ्या दिवशी 10,000 हून अधिक रुग्ण आढळले, सरकारने दिला इशारा
- स्पेसएक्स रॉकेटवरून 4 अंतराळवीर ISS साठी रवाना, भारतीय अमेरिकन राजा चारी करणार ‘क्रू 3’ मिशनचे नेतृत्व