• Download App
    kalyan-singh-death-former-cm-of-uttar-pradesh-kalyan-singh-passed-away

    राममंदिर लढ्याचा महानायक काळाच्या पडद्याआड!

    उत्तर प्रदेशचे राजकारण गुंतागुंतीचे! जातीवर आधारलेले! भाजपचा जनाधार या राज्यात वाढवताना कल्याणसिंग यांनी जे राजकीय कौशल्य दाखवले, मुलायमसिंगसारखा कसलेला मल्ल समोर असताना त्यांनी ज्या प्रकारे त्यांना राजकीय आखाड्यात लीलया लोळवले, त्याने उत्तर प्रदेशात हिंदू मतांचा जो प्रभाव निर्माण झाला त्यातून देशात एक नवे राजकीय वातावरण तयार झाले…


    कल्याण सिंग गेले ही बातमी आली आणि मन नकळत ६ डिसेंबर १९९२ च्या त्या माध्यान्ही कडे ओढले गेले. त्या दिवशीची ती सायंकाळ कडे झुकणारी दुपार ! सूर्य अस्ताला चालला होता; पण त्याचवेळी राम जन्मभूमीच्या व्यासपीठावर एक तेजस्वी सूर्य तळपत होता ! त्याचे नाव होते कल्याणसिंग! kalyan-singh-death-former-cm-of-uttar-pradesh-kalyan-singh-passed-away

    संतप्त कार सेवकांनी तो बाबरी ढाचा उध्वस्त करण्याचे काम पूर्ण केले होते. रामलला स्थापित होत होते. मुख्यमंत्री कल्याणसिंग यांच्या आदेशानुसार कोणी ही पोलिसांनी एक ही गोळी झाडली नव्हती किंवा लाठीमार केला नव्हता. त्या सर्वांना पुढे काय अशी धास्ती पडली होती ! आशा वेळेस कल्याणसिंग गरजले, “ज्या अधिकाऱ्यांनी परिस्थिती हाताळली त्यांनी कुठलीही चूक केलेली नाही. या सगळ्या घटनेची मी जबाबदारी घेतो. तुमच्यावर कुठली ही कारवाई होणार नाही, याची मी हमी घेतो ”

    वास्तविक संधी साधू राजकारणी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पोलीस अधीकाऱ्यांचा बळी घेऊ शकले असते किंबहुना ती प्रथा आपल्याकडे होतीच ! परंतु कल्याणसिंग रामभक्त होते. खुर्ची काय पुर्ण जीवन राम लला साठी अर्पण करणारे होते . त्यामुळे झाल्या घटनेची जबाबदारी स्वीकारत त्यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची भिरकावून दिली.

    राम जन्मभूमी लढ्याचे खऱ्या अर्थाने तीन जे नायक होते. त्यात सर्व साधू संतांना आणि समाजाला एकत्र आणणारे अशोक जी सिंघल , रथयात्रा काढून निर्णायक राजकीय लढा देणारे लालकृष्ण अडवाणी आणि उत्तर प्रदेशात मुलायम , मायावती आणि बाबरी कमीटी बरोबर लढणारे कल्याणसिंग !

    १९८९ च्या कारसेवेच्या वेळेस ते अटकेत होते; पण जेल मध्ये असताना प्रत्येक कारसेवकाची काळजी घेत होते. १९९२ च्या कारसेवेच्या वेळेस ते मुख्यमंत्री होते पण भूमिका तीच सच्च्या राम भक्तांची ! ३.७७ एकर जागा मंदिर ट्रस्टला देणे आणि कारसेवक सुरक्षित कारसेवेसाठी अयोध्ये पर्यंत पोहचवणे यात त्यानि कुठेही कर्तव्यात कसूर केली नाही आणि म्हणूनच ते या आंदोलनातील एक महानायक ठरले.



    त्या वेळी राष्ट्रीय एकात्मता परिषद असायची . सगळे मुख्यमंत्री त्यात असायचे . राम मंदिर या विषयावर अनेकांनी त्यांना घेरायचा प्रयत्न केला पण त्यावेळी त्यांनी आपल्या तडाखेबंद भाषणाने सगळ्या तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकांचे पितळ उघडे पाडले. त्यांचे ते भाषण हिंदुत्वाची बुलंद सिंहगर्जना होती.

    उत्तर प्रदेशचे राजकारण गुंतागुंतीचे ! जातीवर आधारलेले ! भाजपचा जनाधार या राज्यात वाढवताना त्यांनी जे राजकीय कौशल्य दाखवले , मुलायमसिंग सारख्या कसलेला मल्लासमोर असताना त्यांनी ज्या प्रकारे त्यांना राजकीय आखाड्यात लीलया लोळवले त्याने उत्तर प्रदेशात हिंदू मतांचा जो प्रभाव निर्माण झाला त्यातून देशात एक नवे राजकीय वातावरण तयार झाले.

    उत्तर प्रदेशात एके काळी राष्ट्रीय विचार राजकीयदृष्ट्या प्रस्थापित करण्यासाठी झगडावे लागत होते पण कल्याणसिंग यांच्या रूपाने योग्य चेहरा मिळाला आणि रामजन्मभूमी आंदोलनाला एक निर्णायक राजकीय नेतृत्व उत्तर प्रदेशात निर्माण झाले. यातुन वाढलेला जनाधार हा केंद्रात वाजपेयी यांचे सरकार स्थापन होण्यास पण उपयोगी पडला .

    नंतरच्या काळात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही घटना या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या मनाला खूप वेदना देणाऱ्या होत्या. पण आयुष्याच्या शेवटी राज्यपाल म्हणून काम करण्यास त्यांना संधी मिळणे हा त्यांचा उचित गौरव म्हणावा लागेलं असाच होता.

    कदाचित स्वर्गलोकांत अशोकजी, अटलजी आणि अनेक राम जन्मभूमी लढ्यातील योद्धे त्यांची वाट बघत असावीत. रामजन्मभूमी लढ्यातील यशस्वी गाथा , मंदिर निर्माण कार्याची प्रगती, भूमिपूजन कार्यक्रमाचा वृत्तांत प्रत्यक्ष कल्याणसिंग यांच्या तोंडून त्यांना ऐकायचा असेल. कोठारी बंधू आणि आणि अनेक समर्पित कारसेवकांची कल्याणसिंग यांच्या स्वागताची तयारी सुरू असेल . आम्हाला मात्र आता कल्याणसिंग यांचे दर्शन होणार नाही.

    एका समर्पित योद्धयास त्रिवार मानवंदना !

    kalyan-singh-death-former-cm-of-uttar-pradesh-kalyan-singh-passed-away

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!