केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत सांगितले की, डिसेंबर २०२३ पर्यंत भारतीय नागरिक चीन किंवा नेपाळमधून न जाता कैलास मानसरोवरला जाऊ शकतील. त्यांनी सांगितले की, उत्तराखंडमधील पिथौरागढमार्गे एक रस्ता बनवला जात आहे जो थेट मानसरोवरपर्यंत जाईल. हा मार्ग तयार झाल्यानंतर केवळ वेळच कमी होणार नाही, तर अवघड वाटही पूर्वीपेक्षा खूपच सोपी होईल.KAILASH MANSAROWAR: Nitin Gadkari who makes difficult roads easier! Soon Yatra to Kailash Mansarovar from India; road work even in -5 degree Celsius temperature
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सगळ्यात कठीण यात्रा म्हणजे कैलाश मानसरोवरचा उल्लेख केला जातो मात्र आता ही बिकट वाट मोदी सरकारच्या प्रयत्नांनी सोपी होणार आहे .सन 2023 पर्यंत भारतीय नागरिक चीन किंवा नेपाळला न जाता थेट भारतातूनच कैलास मानसरोवरला जाऊन दर्शन घेऊ शकतील. उत्तराखंडच्या पिथौरागड येथून एक मार्ग बनविण्यात येत असून तो थेट कैलास मानसरोवरला पोहचणार आहे, असं केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत बोलताना सांगितलं.KAILASH MANSAROWAR: Nitin Gadkari who makes difficult roads easier! Soon Yatra to Kailash Mansarovar from India; road work even in -5 degree Celsius temperature
गडकरींनी संसदेत या मार्गाबाबत सांगितले की, तेथे मार्ग तयार करण्यात अडचणी आल्या आहेत, परंतु -5 अंश सेल्सिअस तापमानातही लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मशिनची वाहतूक करण्यात आली आहे. या संपूर्ण मार्गाचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. कैलास मानसरोवर यात्रेचे केवळ हिंदूच नव्हे तर जैन आणि बौद्ध धर्मातील लोकांसाठी धार्मिक महत्त्व आहे.
कैलास पर्वत आणि मानसरोवर कुठे आहे?
कैलास पर्वत आणि मानसरोवर सरोवर तिबेटच्या नागरी प्रदेशात आहेत. येथे शिवाचा वास असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. मानसरोवर तलाव महत्त्वाचा मानला जातो कारण या तलावात देवता स्नान करतात अशी लोकांची श्रद्धा आहे. दरवर्षी लाखो लोक या पवित्र ठिकाणी पोहोचतात.
सध्या नेपाळ आणि चीनमार्गे कैलास मानसरोवरला जाण्यासाठी 20 दिवस लागतात. हा प्रवास खूप खडतर आहे. केवळ निरोगी लोकच येथे प्रवासासाठी अर्ज करू शकतात. हा परिसर उंचीमुळे अत्यंत संवेदनशील आहे. 1998 मध्ये, प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना प्रोतिमा गौरी बेदीसह 180 हून अधिक लोक कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान भूस्खलनात मरण पावले.
उत्तराखंड मार्गाद्वारे होणाऱ्या प्रवासामुळे केवळ वेळेचीच बचत होणार नाही, तर सध्याच्या प्रवाशांसाठी एक सहज आणि सुलभ रस्तेमार्गही निश्चित करण्यात येत आहे. सध्या वाहतूक मंत्रालयाद्वारे जम्मू आणि काश्मीरमध्ये रस्ते संपर्क वाढविण्यात येत आहे. त्यामुळे, मुंबई, दिल्ली आणि श्रीनगर येथे प्रवास करताना वेळेची मोठी बचत होईल. या सर्व योजनांसाठी 7 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही नितीन गडकरींनी संसदेत खासदारांना माहिती देताना सांगितले.
कैलास मानसरोवर यात्रा ही हिंदूंसह बौद्ध आणि जैन धर्मीयांसाठीही धार्मिक महत्व असलेली यात्रादर्शन आहे. त्यामुळे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदार प्रतिनिधींसह जोजिला टनल या भोगद्याला पाहण्यासाठी भेट द्यावी, असा आग्रहही गडकरी यांनी केला आहे. तसेच, मनाली इथं अटल बोगदा बनवण्यात आला आहे. सुरूवातीला साडे तीन तास प्रवास करायला लागत होता. आता केवळ ८ मिनिटांत प्रवास होत आहे. लडाख लेहहून थेट कारगील, कारगील ते झेरमर आणि झेरमरहून श्रीनगर मोठे महामार्ग बनत आहेत, अशी माहितीही गडकरींनी दिली.
श्रीनगर ते मुंबई अवघ्या 20 तासांत
केंद्रीय रस्ते व महामार्ग निर्माण मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी संसदेत देशाच्या रस्त्यांचा रोडमॅप समोर ठेवला. येत्या २०२४ पर्यंत देशाचे रस्ते अमेरिकेसारखे करण्यात येतील. यावर्षी डिसेंबरपर्यंत दिल्लीपासून अनेक शहरं २ तासांच्या अंतरावर असतील. त्याचसोबत श्रीनगर ते मुंबई हे अंतर २० तासांत पार करता येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोदी सरकारच्या काळात देशभरात रस्त्यांचे जाळे विणले. विविध महामार्ग, उड्डाणपूल बांधले. संसदेत गडकरींनी नेमकं काय काय सांगितले ते जाणून घेऊया.