बाल लैंगिक शोषण कायद्याखाली एका पाठोपाठ एक वादग्रस्त निकाल -मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील अतिरिक्त न्या. पुष्पा वीरेंद्र गनेडीवाला यांना चांगलेच भोवले.
न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाल यांनी आपला राजीनामा दिला आहे. त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या (Nagpur Bench of Mumbai High Court) अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम पाहत होत्या.कार्यकाळ संपण्याच्या एक दिवस आधी राजीनामा दिला.
स्किन टू स्किन टच केस विनयभंग प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर करताना न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला यांनी त्वचेचा त्वचेशी संपर्क नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे POSCO कायद्यानुसार ही लैंगिक हिंसा मानली जाऊ शकत नाही.
विशेष प्रतिनिधी
नागपूर : वादग्रस्त निर्णय दिल्याने चर्चेत आलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या अतिरिक्त न्यायाधीश पुष्पा गनेडीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा 12 फेब्रुवारी पर्यंत अतिरिक्त न्यायाधीश म्हणून कालावधी होता. मात्र त्या आधीच त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला (Justice Pushpa Ganediwala resigns) यांना हायकोर्टाच्या नियमित न्यायमूर्ती बनवण्याची शिफारस मागे घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजियमने हा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जातं आहे.Justice Pushpa Ganediwala resigns
न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाल यांचा वादग्रस्त निवाडा:
गेल्या वर्षी १९ जानेवारीला एका प्रकरणाचा निकाल जाहीर करताना, न्यायाधीश गनेडीवाल यांनी एक निरीक्षण नोंदवले होते. त्वचेचा त्वचेशी संपर्क झाला नसेल, तर तो अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार होत नाही, त्यामुळे आरोपींवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करता येत नाही.
त्यानंतर २८ जानेवारीला लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेल्या एका ५० वर्षाच्या व्यक्तीच्या याचिकेवरही एक वादग्रस्त निर्णय दिला होता. या व्यक्तीवर पाच वर्षाच्या मुलीसमोर पँटची चेन उघडल्याचा आरोप होता. पण हे कृत्य पॉस्को कायद्याखालील गुन्हा (Crimes under the POSCO Act) होत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.