वृत्तसंस्था
जम्मू: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने घेतला आहे. सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द झाली आहे. jk govt has decided to cancel shri amarnath ji yatra second year in row
अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ही यात्रा रद्द करण्याची घोषणा केली. मात्र, भाविकांना २८ जूनपासून ऑनलाइन दर्शन घेता येईल, अशी माहिती बोर्डाने दिली आहे.
अमरनाथ यात्रा २८ जूनपासून सुरू होऊन २२ ऑगस्ट रोजी समाप्त होणार होती. एकूण ५६ दिवस ही यात्रा सुरू राहणार होती. भारतासह जगातून लाखो भाविक यात्रेत सहभागी होतात.
व्यवसायिकांकडून नाराजी व्यक्त
अमरनाथजी बोर्डाने घेतलेल्या निर्णयावर जम्मू चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रमुख अरुण गुप्ता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, या निर्णयाचा थेट परिणाम व्यवसायांवर होईल. शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करावा. यात्रा रद्द करण्यापेक्षा भविकांच्या संख्येवर मर्यादा आणली जाऊ शकते.