योगायोगाने तरूण चुग यांना हैदराबाद महापालिका आणि डीडीसी निवडणुकांचे काम एका पाठोपाठ करण्याची संधी मिळाली. हैदराबादच्या निवडणुकीतील कामाचा अनुभव त्यांना नक्कीच उपयोगी ठरला.
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू – काश्मीरमधील डीडीसीच्या निवडणुकीतील भाजपच्या यशाचे श्रेय भाजपचे राज्य प्रभारी तरूण चुग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आणि त्यांनी लागू केलेल्या योजनांना दिले आहे. ते राजकीय अर्थापलिकडचे आहे. कारण या योजना राज्याच्या सर्वदूर भागांमध्ये पोहोचल्याचा प्रत्यय भाजपच्या नेत्यांना या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आला आहे. J&K elections tarun chugh latest news
तरूण चुग हे मूळचे पंजाबचे तरूण नेते भाजपचे जम्मू – काश्मीर आणि तेलंगणचे प्रभारी आहेत. त्यांनी सुखबीरसिंग बादल यांच्यासारख्या हेविवेटशीही पंगा घेतला आहे… त्यांच्या आक्रमकतेची ओळख करून देण्यासाठी ही हे वाक्य पुरेसे आहे.
योगायोगाने तरूण चुग यांना हैदराबाद महापालिका आणि डीडीसी निवडणुकांचे काम एका पाठोपाठ करण्याची संधी मिळाली. हैदराबादच्या निवडणुकीतील कामाचा अनुभव त्यांना नक्कीच उपयोगी ठरला. काश्मीरच्या खोऱ्यातील दुर्गम भागात मोदींच्या योजना पोहोचल्या आहेत. जनधन खात्यांमध्ये पैसे जमा होणे, महिलांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळणे, लॉकडाऊनच्या काळात धान्यवाटपाचा लाभ होणे हे तिथे घडले आहे. याचा उपयोग करून तरूण चुग यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची फळी तिथे जमिनी स्तरावर उभी केली आहे. मोदीजीने दिया है, हे वाक्य भरपूर काम करून गेले आहे आणि तरूण चुग यांनी त्याला हे श्रेय देणे हा याचा खरा अर्थ आहे. राजकीय तोंडपुजेपणा पलिकडचा हा अर्थ आहे.
The results of J&K elections marked a big victory for PM @narendramodi ji’s vision of development & progress for the people. The overwhelming turnout of voters is also indicative of the fact that ppl have rejected terrorism & are looking for a new chapter in J&K.
— Tarun Chugh (@tarunchughbjp) December 23, 2020
जिथे तिरंगा उचलायला माणसे मिळणार नाहीत, अशी दर्पोक्ती गुपकारी नेत्यांनी केली होती, तिथे तरूण चुग यांनी जिल्ह्या – जिल्ह्यांच्या दुर्गम भागात जाऊन तरूणांची फळी उभी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. बूथ स्तरापर्यंत हे कार्यकर्ते उभे राहिले. हे भाजपच्या यशाचे खरे शिल्पकार ठरले आहेत.
J&K elections tarun chugh latest news
भाजप केंद्रात सत्ताधारी असल्याने केंद्रीय नेत्यांची फौज प्रचारात उतरविणे हे तुलनेत सोपे होते. पण त्यांच्या प्रचारासाठी जे जमिनी स्तरावर काम करणे आवश्यक होते, त्याची व्यूहरचना तरूण चुग यांनी प्रभारी म्हणून प्रदेश, जिल्हा पातळीवरच्या नेत्यांकडून करवून घेतली आहे. भाजपच्या एकाचवेळी भू-राजनैतिक पाया मजबुतीकरणाचे काम होऊन विस्तारीकरणाचे काम त्याचवेळी सुरू झाले आहे. काम अजून बरेच बाकी आहे. तरूण चुग यांच्यासारख्या तरूण नेत्याला ही संधी मिळते आहे.