• Download App
    (न)भेट ती ही स्मरते अजून या दिसाची; धुंद माध्यमांनी होती, पुडी फेकलेली!!|Jayant patil didn't meet amit Shah today, but marathi media spread fake news

    (न)भेट ती ही स्मरते अजून या दिसाची; धुंद माध्यमांनी होती, पुडी फेकलेली!!

    नाशिक : मराठी माध्यमांनी आज दिवसभर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहांना भेटले अशा बातम्या चालविल्या. जयंत पाटील भाजपमध्ये जाणार, त्यांची राजकीय बेगमी स्वतः अजित पवारांनीच केली. त्यामुळे सक्काळी सक्काळी जयंत पाटील पुण्यात येऊन अमित शहांना भेटले आणि आता लवकरच जयंत पाटील, राजेश टोपे वगैरे नेते “भाजपवासी” होणार, अशा या बातम्या होत्या.Jayant patil didn’t meet amit Shah today, but marathi media spread fake news



    पण सायंकाळ होता होताच त्या बातम्यांमधली हवा दस्तुरखुद्द जयंत पाटील यांनी निदान आज तरी काढून टाकली. मी काल रात्री दीड वाजेपर्यंत मुंबईत राजेश टोपे, अनिल देशमुख सुनील भुसारा यांच्या समवेत होतो. आज सकाळी मी शरद पवारांना भेटलो. राष्ट्रवादीच्या संघटना वाढीविषयी त्यांच्याशी चर्चा केली. सायंकाळी तुम्हाला भेटतोय. मग मी अमित शाहांना भेटायला कुठे गेलो होतो??, काही पुरावा आहे का तुमच्याकडे?? पुरावा असेल, तर बातम्या चालवा नाहीतर तुम्ही नुसतीच माझी प्रसिद्धी तुम्ही करता, अशा शब्दांत जयंत पाटलांनी माध्यमकर्मींना झापडले.

    त्याचबरोबर कुठलाही राजकीय पक्ष बातम्या पेरतो असे नाही, तर तुम्हीच त्या पेरता तुम्हीच बातम्या क्रियेट करता तुम्हीच त्या चालवता मग आता तुम्हीच त्याचे निराकरण करा. रोज तुम्ही सकाळी काहीतरी बातम्या चालवणार, मग आम्हाला त्याचे स्पष्टीकरण विचारणार त्यामुळे आमचे फार तर मनोरंजन होईल. पण त्या बातम्या खऱ्या ठरत नाहीत, अशा शब्दांत जयंत पाटलांनी माध्यमकर्मींना सुनावले.

    पण यामुळेच एक मराठी काव्याचे चांगले विडंबन करता आले. ते काव्य आहे, “भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची” त्याचे विडंबन करून असे म्हणता येऊ शकेल, की “(न)भेट ती ही स्मरते अजून या दिसाची, धुंद माध्यमांनी होती, पुडी फेकलेली!!” जयंत पाटलांच्या अमित शाहांबरोबर झालेल्या (न)भेटीचे वर्णन याच विडंबन काव्यपंक्तीच्या आधारे करता येऊ शकेल!!

    Jayant patil didn’t meet amit Shah today, but marathi media spread fake news

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना