विशेष प्रतिनिधी
भारतातील अल्फान्सो किंवा हापूस हा सर्वांत स्वादिष्ट आंबा मानला जातो. त्याला अक्षरशः स्वर्गीय फळ मानलं जातं. अतिशय सुंदर रंग, गंध आणि चव असलेल्या या आंब्याला जीआय टॅगही मिळाला असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला मोठी मागणी असते. Japanese mango worth millions of rupees
हापूस हा जगातील सर्वात चविष्ट आंबा मानला जातो. पण, जपानचे दोन आंबे तब्बल तीन लाख रुपयांना विकले आहेत. ताईयो नो तामागो (Taiyo no Tamago) असं याचं नावं असून तो लिलवातून मिळतो.
- जगात सर्वांत महाग आंबा
- दरवर्षी याचा लिलाव केला जातो
- हा आंबा लिलावातच विकत घ्यावा लागतो.
- दोन आंब्याची किंमत 3 लाख रुपयांपर्यत
- आंबा तिथल्या मियाझरी प्रांतात पिकवला जातो.
- आंब्याला अननस आणि नारळाचाही स्वाद असतो. – – एका विशिष्ट पद्धतीनं याला पिकवलं जातं.
- आंबा झाडावर जाळीच्या कपड्यानं बांधलं जातो
- आंबा झाडावरच पिकू दिला जातो.