• Download App
    JALNA : काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांची भाजपमध्ये एन्ट्री ! विकासासाठी मी नेहमीच कमळासोबत:गोरंट्याल - त्यावर भागवत कराड म्हणतात जालण्याचा विकास करण्यासाठी कायमचं या आमच्यासोबत JALNA: Congress MLA Kailas Gorantyal enters BJP! For development, I am always with BJP : Gorantyal - Bhagwat Karad says on it, come with us for development of JALNA..

    JALNA : काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांची भाजपमध्ये एन्ट्री ! विकासासाठी मी नेहमीच कमळासोबत – गोरंट्याल ; त्यावर भागवत कराड म्हणतात जालन्याचा विकास करण्यासाठी कायमचं या आमच्यासोबत …

    भाजपच्या  प्रत्येक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावणे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे सतत कौतुक करणे, जालन्याचे काॅंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल भाजपमध्ये प्रवेश करणार की काय? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.


    विशेष प्रतिनिधी

    जालना : भाजपच्या कामांचे कौतुक करणाऱ्या काँग्रेस आमदाराला केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी  थेट भाजप प्रवेशाची ऑफर देऊन टाकली! कराड यांच्या ऑफरमुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.ते आहेत जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल ! त्यांनी वारंवार आपलं भाजप प्रेम जाहीर केलं आहे.JALNA: Congress MLA Kailas Gorantyal enters BJP! For development, I am always with BJP : Gorantyal – Bhagwat Karad says on it,  come with us for development of JALNA

    रेल्वे विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ जालन्यातून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड  आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

    या कार्यक्रमाला कैलास गोरंट्याल  हे देखील उपस्थित होते. विकासासाठी आपण कायम कमळासोबत राहू, असे म्हणत गोरंट्याल यांनी आपल्या भाषणात रावसाहेब दानवे यांचे तोंडभरून कौतुक केले.

    दानवेंच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास अतिशय वेगाने होत आहे, त्यांच्यामुळेच जिल्ह्यात व शहरात पहिल्यांदा सिमेंटचे रोड बघायला मिळत आहेत, नगरपरिषदेच्या माध्यमातून आम्हीही नंतर सिमेंटचे रस्ते केले. पुणे रेल्वे सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांची सोय झाली, असे म्हणत गोरंट्याल यांनी दानवेंची स्तुती केली.

    यांनतर भागवत कराड यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांना भाजप प्रवेशाची ऑफरच देऊन टाकलीय. ‘जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले होते की विकासाठी ते कमळासोबत असतात. पण तुम्ही जर कायमच आमच्यासोबत आलात तर जालन्याचा विकास चांगला होईल, जालना जिल्ह्याचा विकास चांगला होईल, अशी खुली ऑफरच भागवत कराड यांनी गोरंट्याल यांना जाहीर व्यासपीठावरुन दिलीय.

    कुणाला कुठे सामावून घ्यायचे ते आमचे नेते दानवे यांना चांगलेच ठाऊक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच देशाचा विकास होत आहे. त्यामुळे तुम्ही जर भाजपमध्ये आलात तर जालन्याचा विकास देखील अधिक वेगाने होईल, तेव्हा जास्त उशीर लावू नका, तुम्ही कायमचेच आमच्या भाजपमध्ये या.असेही ते म्हणाले त्यामुळे ते कधी कमळ हातात घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    JALNA: Congress MLA Kailas Gorantyal enters BJP! For development, I am always with BJP : Gorantyal – Bhagwat Karad says on it,  come with us for development of JALNA

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस