विशेष प्रतिनिधी
मुंबई : जळगाव जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं स्वातंत्र्यदिनी मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अद्याप हा शेतकरी जळगावातील कुठला आहे, याबाबत माहिती मिळालेली नाही. Jalgaon farmer attempts suicide in front of Mantralaya on Independence Day
पोलिसांनी तात्काळ त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतल्यानं पुढील अनर्थ टळला. आज सकाळी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर काही वेळानंच हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली. या शेतकऱ्यानं असं का केलं याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. याबाबत माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
- स्वातंत्र्यदिनी मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्येचा प्रयत्न
- जळगावच्या शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात
- टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण अद्याप अस्पष्ट
- पोलिसांनी वेळीच रोखल्याने टळला पुढचा अनर्थ
- मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू होतं ध्वजारोहण
- ध्वजारोहणावेळीच शेतकऱ्यानं अंगावर ओतलं रॉकेल