• Download App
    जैतापूरबाबत शिवसेनेच्या भूमिकेत बदल, मात्र मोबदला कोणाला मिळाला, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल | The Focus India

    जैतापूरबाबत शिवसेनेच्या भूमिकेत बदल, मात्र मोबदला कोणाला मिळाला, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

    जैतापुरमध्ये मोबदला मिळाल्याने प्रकल्प होऊ शकतो, असे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. त्यांच्या भूमिकेत झालेला हा बदल पाहून आनंद वाटतो, मात्र, हा मोबदला कोणाला मिळाला, हे पाहावे लागेल, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे.  Jaitapur regarding Change in Shiv Sena’s position

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : जैतापूरमध्ये मोबदला मिळाल्याने प्रकल्प होऊ शकतो, असे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. त्यांच्या भूमिकेत झालेला हा बदल पाहून आनंद वाटतो, मात्र, हा मोबदला कोणाला मिळाला, हे पाहावे लागेल, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे. Jaitapur regarding Change in Shiv Sena’s position

    उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत उद्योजकांशी संवाद साधला होता. यावेळी मोबादला मिळाल्याने जैतापूर प्रकल्प होऊ शकतो, असे स्पष्ट केले. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाणारसंदर्भातही शिवसेनेने अशीच भूमिका घ्यावी. तेथील लोकांनी या प्रकल्पासाठी जमीनही दिलेली आहे.

    शिवसेनेच्या विरोधाला न जुमानता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प राबविण्याचे ठरविले होते. मात्र, शिवसेनेने याविरोधात आंदोलने केली.

    जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असून पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. कोकणासाठी हा अणुऊर्जा प्रकल्प धोकादायक असून स्थानिक रहिवाशांचाही त्याला विरोध आहे. पण पोलिसी बळाच्या जोरावर हा विरोध दडपण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.

    Jaitapur regarding Change in Shiv Sena’s position

    उद्धव ठाकरे म्हणाले होते की, अनेक उद्योजक मला उद्घाटनासाठी निमंत्रण देत असतात. त्यांना मी इतकेच सांगतो की, तुम्ही मला 2050 मध्येही मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला बोलावलंत तरी मी येईन. यावर फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री आशावादी आहे याचा आनंद आहे. त्यांना 50 वर्ष मुख्यमंत्री राहण्यासाठी शुभेच्छा.

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??