• Download App
    Jagannath Yatra: का काढली जाते भगवान जगन्नाथांची रथयात्रा, जाणून घ्या वैशिष्ट्य! । Jagannath Yatra Why Jagnnath Ratha yatra Started Know Religious Stories

    Jagannath Yatra : का काढली जाते भगवान जगन्नाथांची रथयात्रा, आख्यायिका काय सांगतात? जाणून घ्या वैशिष्ट्य!

    Jagannath Yatra : पौराणिक कथेच्या आधारे अनेक श्रद्धावंतांचा असा विश्वास आहे की एकदा श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा तिच्या मातृभूमीकडे परत आली. कृष्ण आणि बलराम यांच्याबरोबर नगर भ्रमणाची इच्छा तिने व्यक्त केली. त्यानंतर कृष्ण बलराम आणि सुभद्रासमवेत रथावरून नगर भ्रमंती केली. तेव्हापासून रथयात्रेला सुरुवात झाल्याचे मानले जाते. Jagnnath Ratha Yatra Why Jagnnath Ratha yatra Started Know Religious Stories


    जगन्नाथ रथयात्रा दवर्षी आषाढ (जुलै) शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी निघते. या वर्षी 12 जुलै 2021, रविवारी रथयात्रा निघणार आहे. रथयात्रेमागची चार कारणांचा, आख्यायिकांचा मागोवा येथे घेत आहोत, यामुळे जगन्नाथ यात्रा महत्त्वाची ठरली आहे. आणखी एक आख्यायिका अशी आहे की, गुंडीचा मंदिरात देवी श्रीकृष्णाची मावशी आहे. त्यांनी तिन्ही भावंडांना आपल्या घरी येण्यास आमंत्रित केले. तेव्हा श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रासमवेत मावशी घरी दहा दिवस राहिले होते.

    तिसरी आख्यायिका अशी आहे की, श्रीकृष्णाचे मामा कंस त्यांना मथुरेला बोलावतात. यासाठी कंस सारथीसह एक रथ गोकुळला पाठवतो. कृष्ण आपल्या भाऊ व बहिणीसह रथात मथुराला जातो. तेव्हापासून रथयात्रा सुरू झाली. तथापि, काही लोक असेही मानतात की, या दिवशी कृष्णाने कंसाचा वध केला आणि मोठ्या भावाने बलरामाने प्रजेला दर्शन देण्यासाठी मथुरेत रथयात्रा काढली.

    चौथ्या आख्यायिकेनुसार, कृष्णाच्या राण्यांनी माता रोहिणीला रासलीला ऐकवण्याची विनंती करतात. आईला वाटते की, सुभद्राने गोपिकांसह कृष्णाची रासलीला ऐकू नये, म्हणून कृष्ण आणि बलराम यांच्यासह ती त्यांना रथयात्रेवर पाठवते. मग नारदजी तिथे येतात आणि तिघांना एकत्र पाहून आनंदित होतात. या तिघांनीही दरवर्षी याप्रमाणे दर्शन द्यावे ही प्रार्थना करतात. तेव्हापासून तिघांचेही दर्शन होते.

    बलराम-सुभद्रा समुद्रात उडी घेतात

    असे सांगतात की, श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव द्वारकेला आणण्यात आले. नंतर बलराम भावाच्या मृत्यूने दु:खी होऊन कृष्णाच्या पार्थिवासह समुद्रात उडी घेतात, सुभद्रादेखील मागोमाग उडी घेते. यादरम्यान भारताच्या पूर्वेकडील पुरीचा राजा इंद्रद्विमुना स्वप्न पाहतो की, कृष्णाचे पार्थिव समुद्रात तरंगत आहे, त्याने येथे कृष्णाचा विशाल पुतळा बांधावा आणि मंदिर बांधावे. स्वप्नात देवदूत सांगतात की, कृष्णासमवेत बलराम सुभद्राची लाकडी मूर्ती बनवा आणि श्रीकृष्णाच्या अस्थी पुतळ्याच्या मागे छिद्र करून ठेवाव्यात.

    मूर्ती अपूर्ण सोडून जातात विश्वकर्मा

    राजाचे स्वप्न सत्यात उतरले आणि कृष्णाच्या अस्थी समुद्रावरून मिळाल्या. पुतळा कोण बनवणार, असा तो विचार करत होता. तेथे विश्वकर्मा येतात, पण कामाच्या आधी ते सर्वांना इशारा देतात की, त्यांना कामाच्या दरम्यान त्रास देऊ नये, अन्यथा ते काम अपूर्ण सोडून जातील. काही महिन्यांनंतरही मूर्ती तयार झाली नाही, म्हणून राजा घाईघाईने खोलीचा दरवाजा उघडतो. दार उघडल्याबरोबरच विश्वकर्मा अदृश्य होतात. मूर्ती अपूर्णच असते, परंतु राजा तशाच मूर्तीची स्थापना करतो. राजा पहिल्या मूर्तीच्या मागे श्रीकृष्णाच्या अस्थी ठेवून मंदिरात विराजमान करतो.

    Jagnnath Ratha Yatra Why Jagnnath Ratha yatra Started Know Religious Stories

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य