• Download App
    It happens at home, your own personality blossoms

    लाईफ स्किल्स : घरातच घडते, फुलते आपले स्वतःचे व्यक्तीमत्व

    व्यक्तीमत्व म्हटले की त्याच्यात उजवे – डावे हे आलेच. कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि व्यक्ती तितक्या प्रकृती हा निसर्गनियमच आहे. त्याला कोणीही अपवाद नाही. अनेकदा घरातच व्यक्तीमत्वाला आकार मिळत असतो.

    मात्र याचे भान आपल्याला नसते. कळत नकळत आपले व्यक्तीमत्व घडत असते. तसेच आपल्या वागण्याने इतरांचेही व्यक्तीमत्व फुलत असते. त्यामुळे त्याचेही भान राखणे गरजेचे असते. माणूस म्हटला, की त्याच्यात काही गुण व अवगुण हे आलेच.It happens at home, your own personality blossoms

    घरात विशेषतः पती पत्नी किंवा दोन प्रेमी जीवांचे नाते हे काहीसे नाजूकच म्हणावे लागेल. या नात्यामध्ये दोघेही स्वभावाने अगदी भिन्न असले, तर मामला अजूनच बिकट होण्याची शक्यता असते. कारण दोन जणांच्या कोणत्याही नात्यामध्ये एक व्यक्ती दुसरीपेक्षा अधिक वरचढ असते. आणि मग ती व्यक्ती आपल्या जोडीदाराला आपल्या मनाप्रमाणे बदलण्याचा प्रयत्न सुरु करते, आणि इथेच सगळे बिनसते.

    जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या सततच्या मानसिक दबावामुळे प्रेमसंबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ लागतो आणि काही वेळेला तर संबंध संपुष्टात यायची वेळही येऊन ठेपते. त्यामुळे अशा वेळी व्यक्तीमत्वाला आकार देणे गरजेचे असते. यासाठी काही बाबी कराव्याच लागतात. सतत काही ना काही कारणांनी आपल्या जोडीदाराच्या सवयींमध्ये किंवा त्याच्या स्वभावामध्ये चुका काढणे, त्याला कमी लेखणे टाळायला हवे.

    आपल्या जोडीदाराने आपण म्हणतो तसेच राहायला हवे किंवा वागायला हवे हा आग्रह टाळायला हवा. आपल्या जोडीदाराला स्वतंत्र व्यक्तिमत्व असून त्याचीही अनेक बाबतीत आपल्यापेक्षा निराळी मते असू शकतात हे समजून घ्या.

    जर दोघेही आपले विचार एकमेकांवर सतत लादत राहिले, तर त्या विचारांचे ओझे वाटायला लागते. मग मन मारून जगणे सुरू होते. या अशा वातावरणात व्यक्तीमत्व फुलत नाही. त्याला आकार द्यायचा असेल तर त्याला मोकळीकही दिली पाहिजे हे नक्की. मोकळ्या वातावरणात खऱ्या अर्थाने विचारांना गती येते, भावना व्यक्त करण्यात संकोच त नाही. त्यामुळे व्यक्तीमत्व बहरण्यास मदत होते.

    It happens at home, your own personality blossoms

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!