• Download App
    ISIS, Al Quida becoming strong

    इसिस, अल कायदाला पुन्हा बळ?, आज्ञापालन शिकविण्याचे तालिबानचे इमामांना फर्मान

    विशेष प्रतिनिधी

    काबूल : अफगाणीस्तानमध्ये तालिबानी राजवट आल्यामुळे इसिस आणि अल कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांना पुन्हा बळ मिळण्याची शक्यता संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तालिबानला हाताशी धरून या संघटना पुन्हा एकदा आपला प्रभाव वाढवू शकतात. अल कायदा आणि इसिसचा प्रभाव वाढल्यास केवळ अफगाणिस्तानमध्येच नाही तर इतर देशांमध्येही दहशतवादी हल्ले होण्याचा धोका वाढेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. ISIS, Al Quida becoming strong

    दरम्यान, नमाजच्यावेळी जनतेला आज्ञापालनाची शिकवण द्यावी असे फर्मान तालिबानने अफगाणिस्तानमधील इमामांना काढले आहे. १५ ऑगस्ट रोजी सत्ता बळकावल्यानंतर जनतेला माफी देत जनजीवन पुर्ववत सुरु करावे असे सांगण्यात आले होते.



    त्यानंतर पहिल्या शुक्रवारी नमाजच्यावेळी आपल्या गटाविरुद्धच्या नकारात्मक बातम्यांचे खंडन करावे असे इमामांना सांगण्यात आले होते. त्यानंतर या शुक्रवारी नवे फर्मान काढण्यात आले. त्यानुसार शासनकर्त्यांच्या म्हणजे आपल्या आदेशांचे पालन करण्याचे महत्त्व जनतेला समजावून सांगण्यावर लक्ष केंद्रित करा असे आवाहन इमामांना करण्यात आले.

    मायदेशातून पलायन करू नका असेही गेल्या आठवड्यात सांगण्यात आले होते. देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्यास देशबांधवांना इमामांनी प्रेरित करावे. देश सोडून जाण्याचा प्रयत्न करू नये. शत्रूच्या नकारात्मक अपप्रचाराला प्रत्यूत्तर द्यावे, असे आवाहनही करण्यात आले होते.

    ISIS, Al Quida becoming strong

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…