Iraq PM Al Qdimi : इराकने सोमवारी जाहीर केले की, त्यांनी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा एक प्रमुख नेता सामी जसीमला ताब्यात घेतले आहे. इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कदिमी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अटक केलेल्या व्यक्तीचे नाव सामी जसीम आहे. तो दहशतवादी अबू बकर अल-बगदादीचा डेप्युटी म्हणून काम करत होता. Iraq PM Al Qdimi says it arrested top islamic state leader sami jasim
वृत्तसंस्था
बगदाद : इराकने सोमवारी जाहीर केले की, त्यांनी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा एक प्रमुख नेता सामी जसीमला ताब्यात घेतले आहे. इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कदिमी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अटक केलेल्या व्यक्तीचे नाव सामी जसीम आहे. तो दहशतवादी अबू बकर अल-बगदादीचा डेप्युटी म्हणून काम करत होता.
अल-कदिमी यांनी दहशतवाद्याला पकडण्यासाठी इराकी सैन्याने केलेल्या कारवाईला सीमापार गुप्तचर यंत्रणांपैकी सर्वात कठीण कारवाई म्हणून वर्णन केले. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या रिवॉर्ड्स फॉर जस्टिस या कार्यक्रमामध्ये जसीमच्या शिरावर 5 दशलक्ष डॉलर (37 कोटी रुपये) बक्षीस ठेवण्यात आले होते. त्यात म्हटले आहे की, या दहशतवाद्याने इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी कारवायांसाठी वित्त व्यवस्थापनात सहाय्यक म्हणूनही काम केले. परराष्ट्र विभागाने सांगितले की, जसीमने 2014 मध्ये दक्षिण मोसुलमध्ये आयएसचा उपनेता म्हणून काम केले. या दहशतवाद्याने आयएसचा अर्थमंत्री म्हणूनही काम केलेले आहे. तो तेल, वायू, पुरातन वस्तू आणि खनिजांच्या बेकायदेशीर विक्रीतून मिळालेल्या पैशांवर लक्ष ठेवत असे.
इराकच्या ताब्यात
इराकी गुप्तचर अधिकाऱ्यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, जसीमला ओळखल्या परदेशात ताब्यात घेतले होते आणि काही दिवसांपूर्वी त्याला इराकमध्ये आणले आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी हे सांगितले. कारण ते जाहीरपणे मोहिमेवर चर्चा करू शकत नाहीत. जसीमने अल-कायदामध्ये इराकी नेता अबू मुसाब अल-जरकावीसोबत काम केले होते. अबू मुसाब अल-जरकावी हा जॉर्डनचा दहशतवादी होता, जो 2006 मध्ये इराकमध्ये अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झाला.
Iraq PM Al Qdimi says it arrested top islamic state leader sami jasim
महत्त्वाच्या बातम्या
- ब्रिटिश वृत्तपत्राचा दावा : रशियन हेरांनी चोरला अस्ट्राझेनेका लसीचा फॉर्म्युला, त्यावरूनच तयार केली स्पूतनिक-व्ही !
- महाराष्ट्र बंद : ठाण्यात रिक्षाचालकांना मारहाण, बेस्ट बसेसची तोडफोड, मुंबई-सोलापूरमध्ये टायर जाळले… कुठे-कुठे लागलं गालबोट?
- Nobel Prize In Economics : अमेरिकेचे डेव्हिड कार्ड, जोशुआ डी अँग्रिस्ट आणि गिडो इम्बेन्स यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जागांवर सीबीआयच्या धाडी, अनेकांविरुद्ध गुन्हे दाखल
- Lakhimpur Kheri Violence : आरोपी आशिष मिश्राला तीन दिवसांची पोलीस कोठडी, पोलिसांची 14 दिवसांच्या कोठडीची होती मागणी