अयोध्येजवळ धन्नीपूर येथे उभारली जात असलेली मशीद बाबराच्या नावाने कशाला? तो काही भारतीय मुसलमानांचा मसिहा नव्हता. त्यामुळे ही मशीद भारतीय शैलीतच बनविली जावी अशी मागणी राम जन्मभूमी खटल्यातील याचिकाकर्ते इक्बाल अन्सारी यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
अयोध्या : अयोध्येजवळ धन्नीपूर येथे उभारली जात असलेली मशीद बाबराच्या नावाने कशाला? तो काही भारतीय मुसलमानांचा मसिहा नव्हता. त्यामुळे ही मशीद भारतीय शैलीतच बनविली जावी अशी मागणी राम जन्मभूमी खटल्यातील याचिकाकर्ते इक्बाल अन्सारी यांनी केली आहे. Iqbal Ansari wants Indian style mosque, not Babar
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाननंतर राज्य सरकारने धन्नापूर येथे मशीद बनविण्याचे काम सुरू केले आहे. या मशिदीचे डिझाईनही प्रसिध्द झाले आहे. मात्र, अन्सारी यांनी त्याला विरोध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की या मशिदीचे डिझाईन परदेशी आहे. आम्हाला संपूर्णपणे भारतीय शैलीत बनलेली मशीद हवी आहे. ही मशीद केवळ दिखाव्यासाठी नको तर मशीदीचा मुख्य उद्देश हा नमाज पढणे हा असतो.
मशीदीच्या ट्रस्टींवर नाराजी व्यक्त करताना अन्सारी म्हणाले की, गेल्या ७० वर्षांपासून मशीदीसाठी आम्ही लढतो आहोत. मात्र, ट्रस्टींनी मशीदीचे डिझाईन करताना याचिकाकर्त्यांना साधे विचारलेही नाही. बाबराचे नाव मशीदीला देण्यास आमचा विरोध आहे. कारण बाबर हा काही भारतीय मुसलमानांचा मसिहा नव्हता.
Iqbal Ansari wants Indian style mosque, not Babar
बाबी मशीद अ?ऍक्शन कमीटीचे संयोजक आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे कार्यकारी सदस्य जफरयाब जिलानी यांनीही मशीदीच्या डिझाईनवर नाराजी व्यक्त केली आहे. मशीदीची ब्ल्यू प्रिंट प्रसिध्द करणे शरियतच्या विरोधात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.