वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीत पकडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांचा 1993 प्रमाणेच साखळी बॉम्बस्फोट घडविण्याचा डाव होता असा धक्कादायक खुलासा दिल्ली पोलिसांच्या तपासातून करण्यात आला आहे.Investigation reveals that the planning by Pak-organised terror module was on the pattern of 1993 Mumbai serial blasts
हे दोन दहशतवादी ओमान मार्गे पाकिस्तानला गेले. पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात त्यांनी प्रशिक्षण घेतले. ग्वादर बंदरावरून ते आधी ओमानला गेले ओमानमधून पाकिस्तानला समुद्रमार्गाने आले. समुद्रातच त्यांनी मोटार बोट बदलली. त्यांच्या पासपोर्टवर कोणत्याही देशाचे शिक्के आढळले नाहीत.
पाकिस्तानातून भारतात आल्यानंतर ते वेगवेगळ्या शहरातील आपल्या हस्तकांना एकत्रित भेटणार होते आणि त्यानंतर 1993 मुंबईत विविध ठिकाणी घडविलेल्या साखळी बॉम्बस्फोटा प्रमाणेच बॉम्बस्फोट घडविण्याचा त्यांचा डाव होता, असा खुलासा दिल्ली पोलिसांच्या तपासात करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि दिल्ली येथून सहा दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. यापैकी दोन दहशतवाद्यांचा तपास दिल्लीत करण्यात येत आहे. या तपासातूनच 1993 मुंबई बॉम्बस्फोट याप्रमाणे साखळी बॉम्बस्फोट घडविण्याचा त्यांचा डाव उघडकीस आला आहे.
Investigation reveals that the planning by Pak-organised terror module was on the pattern of 1993 Mumbai serial blasts
महत्त्वाच्या बातम्या
- मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचे कारस्थान; जान मोहम्मदचे दाऊद गँगशी २० वर्षांपासून संबंध; एटीएसचा खुलासा!
- डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात पाच जणांवर आरोप निश्चित, आरोपींनी केले आरोप अमान्य
- लोकजनशक्ती पक्षाचे खासदार प्रिन्स राज पासवान यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार
- घराजवळ दुसऱ्यांदा स्फोट झाल्याचा भाजप खासदाराचा दावा, तृणमूल कॉंग्रेसवर हल्ल्याचा आरोप