कोरोनाविरुध्दच्या लढाईत पंतप्रधान मोदी यांच्यासहित संपूर्ण देश लढत असताना परदेशी माध्यमांकडून मोदींची हुकूमशहा अशी प्रतिमा निर्माण करण्याचा डाव आखला जात आहे. फेसबुकने रिझाईन मोदी हा हॅशनटॅग हटविल्याचे भांडवल केले जात आहे. मात्र, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘फेसबुक’ला ‘मोदी राजीनामा द्या’ (रिझाईन मोदी) हा हॅशटॅग हटवण्याचे कोणत्याही प्रकारचे निर्देश देण्यात आले नव्हते, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. Intrigue to create a dictatorial image of Modi misrepresentation of resignation Modi hashtag by foreign media
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाविरुध्दच्या लढाईत पंतप्रधान मोदी यांच्यासहित संपूर्ण देश लढत असताना परदेशी माध्यमांकडून मोदींची हुकूमशहा अशी प्रतिमा निर्माण करण्याचा डाव आखला जात आहे. फेसबुकने रिझाईन मोदी हा हॅशनटॅग हटविल्याचे भांडवल केले जात आहे. मात्र, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘फेसबुक’ला ‘मोदी राजीनामा द्या’ (रिझाईन मोदी) हा हॅशटॅग हटवण्याचे कोणत्याही प्रकारचे निर्देश देण्यात आले नव्हते, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेन्ड झाल्यानंतर तो ब्लॉक करणे हा सार्वजनिक असंतोषावर नियंत्रण मिळवण्याचा एक प्रयत्न होता, असा आरोप अमेरिकेतील वर्तमानपत्र ‘वॉल स्ट्रीट जर्नल’कडून करण्यात आला होता. यावर केंद्र सरकारने म्हटले आहे की, हा आरोप संपूर्णत: भ्रामक आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’नं ५ मार्च रोजी प्रकाशित केलेली बातमी संपूर्णत: बनावट आणि ‘निर्मित’ आहे. सरकारकडून हा हॅशटॅग हटवण्याचे निर्देश देण्यात आले नव्हते. फेसबुकनंही हे स्पष्ट केलंय की हा हॅशटॅग चुकीनं हटवण्यात आला होता, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
भारताने फेसबुक, व्हॉटसअप आणि ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना तुरुंगात धाडण्याची धमकी दिली, अशा मथळ्याखाली ‘वॉल स्ट्रीट जर्नल’नं ५ मार्च २०२१ रोजी एक बातमी प्रसिद्ध केली होती. सरकारकडून या संपूर्णत: ‘खोट्या’ आणि ‘रचित’ माहितीवर आधारीत बातमीसंबंधी वॉल स्ट्रीट जर्नलला अधिकृतरित्या सूचित करण्यात आले होते, असे सांगण्यात आले आहे.
केंद्र सरकारने याबाबत जारी केलल्या निवेदनात म्हटले आहे की, आमचे करोना योद्धे आणि वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रयत्न समोर आणण्यात मीडिया महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अशा संवेदनशील प्रसंगी कोट्यवधी सामान्य भारतीयांशी जोडून सर्व जण या महामारीविरोधात एकत्र उभे राहू असे आवाहन आम्ही मीडियाला करत आहोत.
याबाबत फेसबुकने स्पष्टीकरण दिले असून सरकारच्या सांगण्यानुसार ब्लॉक केलेला नसल्याचे फेसबुकने म्हटले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार संबंधित हॅशटॅग चुकीने ब्लॉक झाला होता. ठरावीक कालावधीनंतर काही हॅशटॅग ब्लॉक करण्यात येतात. त्यामागे वेगवेगळी कारणे असतात.
Intrigue to create a dictatorial image of Modi misrepresentation of resignation Modi hashtag by foreign media
महत्वाच्या बातम्या
- Exit Polls Results 2021 LIVE On The Focus India : आसाम, पुदच्चेरी भाजपकडे, तमिळनाडू द्रमुककडे, केरळ डाव्यांकडे.. पण बंगालमध्ये गौडबंगाल!
- West Bengal The Focus India Exit Poll Results 2021 : पश्चिम बंगालमध्ये सस्पेन्सच… अगदी एक्झिट पोल्स देखील दुभंगलेले! कोणाला काटावरचे बहुमत? की त्रिशंकू विधानसभा?
- Tamil Nadu The Focus India Exit Poll Results 2021 : तमिळनाडूत द्रमुकचा आवाज; स्टॅलिन नवे करूणानिधी
- Assam The Focus India Exit Poll Results 2021 : आसाममध्ये पुन्हा कमळ फुलणार भाजप आघाडीचा काँग्रेसला झटका
- Kerala The Focus India Exit Poll Results 2021 : केरळमध्ये पुन्हा डावी लोकशाही आघाडी सत्तेवर येण्याचा अंदाज
- Puducherry The Focus India Exit Poll Results 2021 : केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीत भाजपची बाजी ; कमळ फुलणार ; काँग्रेसचे स्वप्न भंगणार