विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिकांचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी भाजप आमदारांनी सोमवारी (ता.५) केली. International Airport Ba. Name Patil
राज्य विधिमंडळाचे अधिवेशनास आज सुरुवात झाली. त्या पार्श्वभूमीवर ही मागणी भाजप आमदारांनी केली. आमदारांनी मागणीचे फलक हातात घेत घोषणाबाजी केली.
विमानतळ परिसरात राहणाऱ्या स्थनिकांना असे वाटते की दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे. या उलट महाविकास आघाडीतील सत्ताधारी शिवसेनेच्या मनात स्व. बाळसाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळाला द्यावे, असे असून तसा प्रस्तावही विचाराधीन आहे. पण, कोणाचे नाव विमानतळाला द्यावे, याचा निर्णय झालेला नाही.
– विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या
– भाजप आमदारांची विधानसभेबाहेर मागणी
– बाळासाहेबांचे नाव देण्याचा शिवसेनेचा विचार
– दि. बा. पाटील यांच्या नावाचा स्थानिकांचा आग्रह
– बाळासाहेब ठाकरे, दि. बा. पाटील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाची चर्चा