• Download App
    राज्यातील सर्वच इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना कोरोना काळासाठी मिळणार अतिरिक्त भत्ता | The Focus India

    राज्यातील सर्वच इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना कोरोना काळासाठी मिळणार अतिरिक्त भत्ता

    • देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई, पुण्याप्रमाणेच आता राज्यातील सर्वच इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना कोविड काळातील सेवेसाठी अतिरिक्त भत्ता देण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि आज त्यासाठी एक बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली. intern doctors to get more intencivies during covid 19 period

    आभासी पद्धतीने झालेल्या या बैठकीत फडणवीस हे त्यांच्या निवासस्थानाहून सहभागी झाले होते. यासंदर्भातील सूचना डिसेंबर अधिवेशनात विनियोजन विधेयकाच्या वेळी फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती आणि त्यानुषंगाने आज ही बैठक झाली. intern doctors to get more intencivies during covid 19 period

    मुंबई आणि पुण्यातील इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना 39,000 रूपये आणि 30 हजार रूपये अनुक्रमे याप्रमाणे विशेष भत्ता दिला जात होता. मात्र अन्य शहरांमध्ये तो केवळ 11 हजार रूपये इतकाच होता.

    intern doctors to get more intencivies during covid 19 period

    देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले की, कोरोनाच्या काळात राज्यातील सर्वच जिल्ह्यात डॉक्टर्स आपले योगदान देत आहेत. त्यामुळे केवळ मुंबई, पुण्याला एक न्याय आणि अन्य जिल्ह्यांना दुसरा असे करता येणार नाही.

    त्यामुळे सर्वच जिल्ह्यांसाठी एकच निकष लावण्यात यावा. फडणवीस यांची ही मागणी अजित पवार यांनी तत्काळ मान्य केली आणि वित्त विभागाने प्रतिकूल अभिप्राय दिला असला तरी आपण त्यावर आदेश जारी करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…