ओबीसी लढ्यासाठी कार्यकर्ते तयार व्हावेत
विशेष प्रतिनिधी
जळगाव : राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी जळगावात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ओबीसी लढ्यावर भाष्य करत लढा आणखी तीव्र होण्याची गरज व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, लोकशाहीमधील लढण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्यात एकेक पायरी आहे. Intensify the OBC fight
ओबीसीचे आरक्षण काय आहे ते आजच्या मुलांना समजत नाही, 400 लोकांसमोर आम्ही 2 तास बोलतोय. इतिहास सांगतोय की ओबीसीला आरक्षण कशासाठी पाहिजे, ओबीसीच्या लढ्यासाठी कार्यकर्ते तयार व्हायला पाहिजेत, त्यांना सखोल ज्ञान अभ्यास मिळाला पाहिजे.
दिल्लीमध्येसुद्धा आम्ही एकत्र आलो, पुन्हा तीस तारखेला दिल्लीत आम्ही एकत्र येत आहोत. कोर्टामध्ये आमची लढाई सुरू राहील. पण हळूहळू आम्ही ही लढाईची तीव्रता वाढवू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Intensify the OBC fight