प्रतिनिधी
यवतमाळ : वडिलांच्या मृतदेहाऐवजी दुसऱ्याचाच मृतदेह दिल्याचे स्मशानात गेल्यावर समजले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी यवतमाळ येथील रुग्णालयात तोडफोड केली. आज सकाळी हा प्रकार घडला. धक्कादायक म्हणजे बिल भरले नसल्याने हा मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला नव्हता. Instead of his father’s body, hospital gave another
ॲड.अरुण गजभिये यांचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री मृत्यू झाला. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. नातेवाईक मृतदेह घेऊन अंत्यसंस्कारासाठी पांढरकवडा रोडवरील मोक्षधामात पोहोचले. तेथे मृतदेह उघडून बघितला असता तो ॲड.गजभिये यांचा नसून दुसऱ्याचाच असल्याचे लक्षात आले. त्यामुळे संतापलेले नातेवाईक मोक्षधामातून थेट शहा हाॅस्पिटलमध्ये पोहोचले. तेथे त्यांनी डाॅक्टर व उपस्थित कर्मचाऱ्यांना जाब विचारला. संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली.
गजभिये यांच्याऐवजी सेवानिवृत्त सहायक फाैजदार दिगांबर शेळके यांचा मृतदेह दिल्याचे दिसून आले. शेळके यांचाही शनिवारी रात्रीच मृत्यू झाला होता. मात्र बिलाची रक्कम जमा न केल्याने त्यांचा मृतदेह रुग्णालयाने दिला नाही, असा आरोप मनीषा दिगांबर शेळके यांनी केला. ते मृतदेहासाठी रात्रीपासून रुग्णालयात ताटकळत होते. त्यांना रुग्णालय प्रशासनाने अद्याप प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे, असे सांगून ताटकळत ठेवले होते.
Instead of his father’s body, hospital gave another
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईच्या कोरोना मॉडेलमागे काळंबेरं, आकडेवारी उजेडात येऊ दिली जात नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
- कोरोनाविरोधात लढण्यासाठी अदानी ग्रुपचे योगदान, ऑक्सिजन वाहतुकीसाठी ४८ क्रायोजेनिक टॅँकरची खरेदी
- मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातील चार हजार पाने गायब, भाजपााचा धक्कादायक आरोप
- डीआरडीओच्या या औषधामुळे कोरोना अडीच दिवस अगोदर होतो बरा