16 Crore For Drug : सुप्रसिद्ध दांपत्य विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी पुन्हा आपल्या औदार्याने सर्वांची मने जिंकली आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त चिमुकल्याचे महागडे औषध देऊन प्राण वाचवले आहेत. स्पाइनल मस्क्युलर एट्रोफी नावाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या अयांश गुप्ता या चिमुकल्याला या 16 कोटी रुपयांच्या महागड्या औषधाची नितांत आवश्यकता होती. परंतु महाग असल्याने ते खरेदी करणे बाळाच्या आईवडिलांसाठी अशक्य होते. अशा परिस्थितीत विराट-अनुष्काने पुढाकार घेऊन मदतीचा हात दिला आहे. Inspiring Virat Kohli And Anushka Sharma Arranged 16 Crore For Drug Treatment of Kid Ayansh Gupta
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सुप्रसिद्ध दांपत्य विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी पुन्हा आपल्या औदार्याने सर्वांची मने जिंकली आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त चिमुकल्याचे महागडे औषध देऊन प्राण वाचवले आहेत. स्पाइनल मस्क्युलर एट्रोफी नावाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या अयांश गुप्ता या चिमुकल्याला या 16 कोटी रुपयांच्या महागड्या औषधाची नितांत आवश्यकता होती. परंतु महाग असल्याने ते खरेदी करणे बाळाच्या आईवडिलांसाठी अशक्य होते. अशा परिस्थितीत विराट-अनुष्काने पुढाकार घेऊन मदतीचा हात दिला आहे.
या औषधाची किंमत तब्बल 16 कोटी रुपये आहे. अयांशच्या उपचारांसाठी फंड मिळवण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी AyaanshFightsSMS या नावाने ट्विटर अकाउंट बनवले होते. या ट्विटर हँडलवर विराट आणि अनुष्काचे आभार मानण्यात आले आहेत.
तथापि, अयांशच्या उपचारांसाठी विराट-अनुष्कासोबतच बी-टाऊनच्या तमाम स्टार्सनी या कँपेनमध्ये सहभाग नोंदवला होता. या बालकाच्या आईवडिलांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांचे आभार मानले आहेत. यामध्ये सारा अली खान, अमृता सिंह, अर्जुन कपूर, राजकुमार राव व इतर अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे.
अयांशचे आईवडील म्हणाले की, ‘AyaanshFightsSMA’वरून ट्विट करण्यात आले होते. आम्ही कधी विचारही केला नव्हता की, या कठीण प्रवासाचा इतका सुंदर अंत होईल. आम्हाला हे सांगण्यात फार आनंद होत आहे की आम्हाला अयांशच्या औषधासाठी 16 कोटी रुपयांची गरज होती आणि आम्ही ही रक्कम जमवली आहे. ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे खूप आभार. हे तुमचेच यश आहे. कोहली आणि अनुष्का यांच्यावर त्यांनी ट्विट केले की, आम्ही नेहमीच तुमचे चाहते म्हणून प्रेम करत आलो आहोत. परंतु तुम्ही अयांश आणि या अभियानासाठी जे केले, ते अपेक्षेपेक्षाही जास्त होते. तुमच्या सिक्सरमुळे आम्हाला हा आयुष्याचा सामना जिंकण्यात मदत झाली.”
Inspiring Virat Kohli And Anushka Sharma Arranged 16 Crore For Drug Treatment of Kid Ayansh Gupta
महत्त्वाच्या बातम्या
- विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या पराभवासाठी जबाबदार कोण? जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीने धरला जोर
- CBI चे नवे बॉस कोण? ‘ही’ तीन नावे आघाडीवर, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक
- हरियाणा सरकारचा मोठा निर्णय : पतंजलीच्या १ लाख कोरोनिल किट कोरोना रुग्णांना मोफत वाटणार
- Narada Sting Case : नजरकैदेतील तृणमूल नेत्यांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- PNB SCAM : पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसी बेपत्ता, अँटिगुआ पोलिसांकडून शोध सुरू