Monday, 5 May 2025
  • Download App
    INSPIRATIONAL : बिहारची-संप्रीती यादव-वय२४ वर्ष-गूगल-पगार १ कोटी ! मुलाखतीत ५० वेळा नापास;स्वप्नापुढे अपयशानेही मानली हार... INSPIRATIONAL : After Rejection From 50 Firms, DTU Student SAMPRITI YADAV Bags Rs 1 Crore Job At Google

    INSPIRATIONAL : बिहारची-संप्रीती यादव-वय२४ वर्ष-गूगल-पगार १ कोटी ! मुलाखतीत ५० वेळा नापास;स्वप्नापुढे अपयशानेही मानली हार…

    • भारतात दररोज लाखो तरुण नोकरीसाठी मुलाखती देतात. पण नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही किती वेळा मुलाखती दिल्याचे ऐकले आहेत.१० ते १५ यापेक्षा जास्त मुलाखती दिल्यानंतर क्वचितच एखाद्याला नोकरी दिल्या जाते.
    • बिहारमधील २४ वर्षीय संप्रीती यादव या तरुणीने गुगलमध्ये नोकरी करण्याचे तिचे स्वप्न साकार करण्यासाठी ५० हून अधिक वेळा मुलाखती दिल्या आणि गुगलची नोकरी मिळवली.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई:प्रयत्नांती परमेश्वर, अशी म्हण आपल्याकडे म्हटली जाते. जे लोक प्रयत्न करतात ते कधीही हार मानत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर यशाच्या शिखरावर जायचे असेल तर मेहनत सोडू नका. तुमची स्वप्ने कधीतरी नक्कीच पूर्ण होतील.बिहारमधील संप्रीती यादव (Sampriti Yadav) या २४ वर्षीय तरुणीने कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या बळावर मोठी कामगिरी केली आहे. एक वेळ अशी होती जेव्हा संप्रिती यादव सलग ५० मुलाखतींमध्ये अपयशी ठरली. मात्र आता संप्रिती कमावणार तब्बल १ कोटी…जाणून घेऊया तिच्या यशाची कहाणी …..INSPIRATIONAL : After Rejection From 50 Firms, DTU Student SAMPRITI YADAV Bags Rs 1 Crore Job At Google

    एवढ्या अपयशानंतरही संप्रीतीने हार मानली नाही. आज त्यांना चार कंपन्यांच्या ऑफर आहेत. एवढेच नाही तर गुगलने त्याला १.१० कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेजही ऑफर केले आहे. ज्याचा संप्रीतीने स्वीकार केला आहे.

    लोक आता सोशल मीडियावर यादवबद्दल बोलत आहेत, ती आज अनेक तरुणांसाठी प्रेरणा बनली आहे.

    संप्रीती यादव मूळची बिहारची आहे. संप्रीती यादव या २४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला गुगलमध्ये १.१० कोटी रुपयांची नोकरी मिळाली आहे.

    बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील हरलाखी ब्लॉक भागातील रहिवासी असलेल्या संप्रीती यादवने १ कोटी १० लाख रुपयांचे पॅकेज मिळवून संपूर्ण बिहारचे नाव लौकिक केले आहे.

    संप्रीती यादवने १४ फेब्रुवारीपासून गुगलमध्ये काम करण्यास सुरुवात करणार आहेत. पण तिच्या स्वप्नातील नोकरीचा प्रवास खूप लांब आणि खडतर होता.

    दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक पदवी घेतली आहे. गुगलमध्ये नोकरी मिळवणे संप्रीतीसाठी इतके सोपे नव्हते. यासाठी तिने परीक्षेच्या 9 फेऱ्या पार केल्या आहेत. गुगलने संप्रीतीच्या मुलाखतीच्या 9 फेऱ्या घेतल्या. या सर्व फेरीत संप्रीतीने प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. यानंतरच गुगलकडून एवढ्या मोठ्या पॅकेजसह संप्रीतीला नोकरीची ऑफर मिळाली.

     

    INSPIRATIONAL : After Rejection From 50 Firms, DTU Student SAMPRITI YADAV Bags Rs 1 Crore Job At Google

    Related posts

    Jammu Kashmir : लष्कराचे वाहन ७०० फूट खोल दरीत कोसळले; ३ जवानांचा मृत्यू

    Igla S missile : भारतीय लष्कराला रशियन बनावटीचे इग्ला-एस क्षेपणास्त्र मिळाले

    Manoj Tiwari : मनोज तिवारी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला!