• Download App
    सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय दूर करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पंतप्रधान मोदींना पत्र Injustice on Marathi speaking people in the border areas of Karnatak- Maharashtra ; Deputy Chief Minister Ajit Pawar's letter to Prime Minister Modi

    सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय दूर करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

    वृत्तसंस्था

    मुंबई : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटकातील सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय दूर करा, गावे महाराष्ट्रात सामील करा, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली आहे. Injustice on Marathi speaking people in the border areas of Karnatak- Maharashtra ; Deputy Chief Minister Ajit Pawar’s letter to Prime Minister Modi

    मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन साठहून अधिक वर्षे झाली तरीही, बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह शेकडो मराठी भाषिक गावे कर्नाटकात आहेत.तेथील मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारकडून अन्याय होत आहे. कर्नाटक सरकारची कृती अन्यायकारक व मानवताविरोधी आहे.



    आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष

    सीमाप्रश्नाची लढाई ही महाराष्ट्राच्या वतीने जनतेच्या मनात आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे. सीमाभागातील मराठी भाषकांची आणि महाराष्ट्राची बाजू न्यायोचित असल्याने दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचाच विजय होईल, अशी खात्री अजित पवारांनी व्यक्त केली. सदर प्रश्न आपल्या माध्यमातून तातडीने मार्गी लागावा व सीमाभागातील मराठी बांधवांना लवकर न्याय मिळावा, यासाठी सीमाभागातील मराठी नागरिक लाखो पत्रे लिहून आपणाकडे विनंती करत आहेत, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

    महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्याने मी देखील सीमाभागातील मराठी बांधवांच्या मागणीला पाठिंबा देत असून आपण मराठी भाषिक बांधवांची मागणी मान्य करावी, अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे पंतप्रधानांना केली.

    न्यायासाठी लढा सुरूच राहणार

    बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह  संयुक्त महाराष्ट्र हे प्रत्येक महाराष्ट्रवासियाचे स्वप्न आहे, हा महाराष्ट्र सरकार व जनतेचा दृढनिर्धार आहे. तो पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही. विधायक मार्गाने न्यायासाठीचा लढा सुरू राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्राच्या भूमिकेला पाठिंबा देऊन सीमाभागातील मराठी बांधवांना पंतप्रधानांनी न्याय द्यावा, अशी महाराष्ट्रवासियांची इच्छा असल्याचे अजित पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

    Injustice on Marathi speaking people in the border areas of Karnatak- Maharashtra ; Deputy Chief Minister Ajit Pawar’s letter to Prime Minister Modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भारतीय उद्योगपती ते जागतिक बँक सगळ्यांचीच राहुल गांधी + रघुराम राजन जोडगोळीला चपराक; सेवा क्षेत्र नव्हे तर उत्पादन क्षेत्र वाढविण्याची दिली हाक!!

    सनातनचा अपमान; सरन्यायाधीश भूषण गवईंवर वयोवृद्ध वकिलाचा हल्ल्याचा प्रयत्न; शरद पवारांकडून पहिला निषेध

    मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यात खरंच फाटले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरते तसे दाखविले??