पुणे शहरात नागरिकांना लसीकरण केंद्रावर गेल्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहण्यास मिळते. त्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिकांना कोणत्या केंद्रावर किती डोस मिळणार, ही माहिती घरबसल्या मिळणार आहे. Information on vaccination in Pune is now available at home with a single click
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे शहरात नागरिकांना लसीकरण केंद्रावर गेल्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहण्यास मिळते. त्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिकांना कोणत्या केंद्रावर किती डोस मिळणार, ही माहिती घरबसल्या मिळणार आहे. त्यासाठी संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले असून पुणेकरांना लसीकरणासंदर्भातील सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
लसीकरणासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती आता https://www.punevaccination.in/ या संकेतस्थळावर मिळणार आहे. पुणे महानगरपालिका आणि मराठा चेंबर ऑफ़ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (एमसीसीआयए) यांच्या माध्यमातून या डॅशबोर्डची निर्मिती करण्यात आली आहे.
नागरिकांनी या डॅशबोर्डवर क्लिक केल्यावर त्यांनी वयोगट, लशीचा प्रकार (कोव्हॅॅक्सीन, कोव्हीशिल्ड ) डोसचा प्रकार (पहिला व दुसरा ), लसीकरण केंद्र (सरकारी, खाजगी ) असे पर्याय क्लिकद्वारे निवडायचे आहेत.
त्यानंतर संबधित व्यक्तीला शहरातील सर्व लसीकरण केंद्राची माहिती लोकेशनसह उपलब्ध होणार आहे. त्या त्या लसीकरण केंद्रावर क्लिक केल्यास तेथे कुठला लस व डोस उपलब्ध आहे, याचीही माहिती मिळणार आहे.
Information on vaccination in Pune is now available at home with a single click
महत्त्वाच्या बातम्या
- होय आम्ही भारतासोबत, बलशाली भारत होओचा संदेश देत ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाची इमारात उजळून निघाली तिरंग्या रंगात
- काश्मीरमच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा फोटो वापरणे
- स्वित्झरलॅँड भारताला देणार अंबानी कुटुंबियांच्या स्विस बॅँकेतील खात्यांची माहिती
- लोकशाही वाचविण्यासाठी म्यॉनमारच्या सौंदर्यवतीने हातात घेतली रायफल
- कोरोना उपचार आणि लसीकरणासाठी आधार बंधनकारक नाही, केंद्राचे स्पष्टीकरण
- इस्त्राएल-पॅलेस्टिींमधील संघर्ष थांबावा, भारताची संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भूमिका