• Download App
    सर्वसामान्यांना महागाईचा ठसका : डाळी, खाद्यतेल, फळे आणि भाज्यांचे दर किती वाढले ते जाणून घ्या! । inflation in india retail inflation jumped to more than 6 percent in April and May 2021

    सर्वसामान्यांना महागाईचा ठसका : डाळी, खाद्यतेल, फळे आणि भाज्यांचे दर किती वाढले ते जाणून घ्या!

    inflation in india : देशात एकीकडे कोरोना महामारी आणि दुसरीकडे वाढती महागाई यामुळे सर्वसामान्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) च्या आकडेवारीनुसार, खाद्य तेल, फळे, अंडी यासारख्या खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्यामुळे किरकोळ महागाई मे महिन्यात सहा महिन्यांच्या उच्चांकी 6.3 टक्क्यांपर्यंत पोहोचली. एप्रिलमध्ये महागाई दर 4.23 टक्के होता. मे महिन्यात अन्नधान्यांची महागाई 5.01 टक्के होती. inflation in india retail inflation jumped to more than 6 percent in April and May 2021


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोना महामारी आणि दुसरीकडे वाढती महागाई यामुळे सर्वसामान्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) च्या आकडेवारीनुसार, खाद्य तेल, फळे, अंडी यासारख्या खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्यामुळे किरकोळ महागाई मे महिन्यात सहा महिन्यांच्या उच्चांकी 6.3 टक्क्यांपर्यंत पोहोचली. एप्रिलमध्ये महागाई दर 4.23 टक्के होता. मे महिन्यात अन्नधान्यांची महागाई 5.01 टक्के होती.

    घाऊक महागाईत सलग पाच महिने वाढ

    घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईदेखील मेमध्ये 12.94 टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी कोविड-19 लॉकडाऊनमुळे कच्च्या तेलाची, उत्पादित वस्तूंच्या किमतींची वाढ आणि तुलनात्मक आधार कमकुवत होण्याचे कारण हे आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये किरकोळ महागाईचा उच्चांक 6.93 टक्के होता. मे 2020 मध्ये घाऊक महागाई दर शून्यापेक्षा खाली 3.7 टक्क्यांवर होता, तर एप्रिल 2021 मध्ये ती दोन अंकी 10.49 टक्क्यांवर पोहोचला. सलग पाचव्या महिन्यात घाऊक महागाईचा दर वाढला आहे.

    एप्रिल- मे 2021 दरम्यान कोणत्या वस्तू महाग?

    • इंधन तेल – 38 टक्क्यांनी महाग
    • डाळी – 10 टक्के वाढ
    • खाद्य तेल – 30 टक्क्यांनी वाढ
    • फळांचे दर – 12 टक्क्यांनी वाढले
    • अंडी आणि शीतपेय – 15 टक्क्यांनी महाग

    मांस व मासे, अंडी, फळे, डाळी व त्यातील उत्पादनांच्या दरांमध्ये वार्षिक आधारावर अनुक्रमे 9.03 टक्के, 15.16 टक्के, 11.89 टक्के आणि 9.39 टक्के वाढ झाली आहे. इंधन आणि ऊर्जा श्रेणीतील महागाई 11.58 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. किंमतींच्या वाढीसह, इंधन आणि वीज विभागात ठोक महागाई एप्रिलमधील 20.94 टक्क्यांवरून मेमध्ये 37.61 टक्क्यांवर गेली.

    कांद्यामध्येही तेजी

    उत्पादनांच्या बाबतीत घाऊक चलनवाढीचा दर मेमध्ये 10.8 टक्क्यांवर होता, जो मागील महिन्यात 9.01 टक्के होता. अन्नधान्याच्या बाबतीत मात्र घाऊक चलनवाढीचा दर मेमध्ये किंचित घसरून 4.31 टक्क्यांवर आला आहे. कांद्याचे भाव वाढले असताना कांद्याच्या किमती मेमध्ये 23.24 टक्क्यांनी वाढल्या होत्या, तर एप्रिलमध्ये ते 19.72 टक्क्यांनी घसरल्या.

    inflation in india retail inflation jumped to more than 6 percent in April and May 2021

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य