Indian Womens Hockey Team : भारतीय महिला हॉकी संघाला भलेही ब्रिटनविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले असेल, पण या संघाने 130 कोटी देशवासीयांची मने जिंकली आहेत. पंतप्रधान मोदींनी महिला हॉकी संघाला बोलावून त्यांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी फोन करताच खेळाडूंना गहिवरून आले होते. यादरम्यान, पंतप्रधानांनी संघातील खेळाडूंना प्रोत्साहित केले आणि म्हटले की, देशाला तुमचा अभिमान आहे. भारतीय संघ प्रथमच ऑलिम्पिक उपांत्य फेरीत पोहोचला होता, पण ब्रिटनकडून 3-4 ने पराभव झाला आणि कांस्यपदकापासून वंचित राहावे लागले. Indian Womens Hockey Team Breaks Down During Telephonic Conversation With Prime Minister Narendra Modi
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाला भलेही ब्रिटनविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले असेल, पण या संघाने 130 कोटी देशवासीयांची मने जिंकली आहेत. पंतप्रधान मोदींनी महिला हॉकी संघाला बोलावून त्यांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी फोन करताच खेळाडूंना गहिवरून आले होते. यादरम्यान, पंतप्रधानांनी संघातील खेळाडूंना प्रोत्साहित केले आणि म्हटले की, देशाला तुमचा अभिमान आहे. भारतीय संघ प्रथमच ऑलिम्पिक उपांत्य फेरीत पोहोचला होता, पण ब्रिटनकडून 3-4 ने पराभव झाला आणि कांस्यपदकापासून वंचित राहावे लागले.
पंतप्रधान मोदी संभाषणात काय म्हणाले?
2 मिनिटे 48 सेकंदांच्या व्हिडिओत पंतप्रधान म्हणाले,
पंतप्रधान : तुम्हा सर्वांना नमस्कार !
महिला हॉकी खेळाडू : नमस्कार, नमस्कार सर !
पंतप्रधान : पाहा, तुम्ही सर्व खूप छान खेळलात. तुम्ही एवढा घाम गाळला, एवढा घाम गाळलाय की सर्व काही बाजूला ठेवून तुम्ही साधना करत होता. तुमचा घाम पदक मिळवू शकला नाही, पण तुमचा घाम कोट्यवधी मुलींची प्रेरणा बनला आहे. आपल्या सर्व सहकाऱ्यांचे आणि प्रशिक्षकाचे अभिनंदन. अजिबात निराश होऊ नका. बरं मी बघत होतो की, नवनीतच्या डोळ्याला काही जखम झाली आहे.
महिला हॉकी खेळाडू : होय, तिला काल दुखापत झाली. तिला चार टाके लागले आहेत.
पंतप्रधान : तुम्हाला काही त्रास तर नाही झाला ना! बंदना तुम्ही सर्वांनी खूप छान काम केले. सलिमाने चमत्कार केला.
महिला हॉकी खेळाडू : खूप खूप धन्यवाद सर !
पंतप्रधान : पाहा, तुम्ही सर्वांनी निराश होऊ नये. आज राष्ट्राला तुमचा अभिमान आहे. अजिबात निराश होऊ नका. भारत ही हॉकीची ओळख आहे. भारतात अनेक दशकांनंतर हॉकीचे पुनरुज्जीवन होत आहे आणि ते आपल्या मेहनतीमुळे घडत आहे. यादरम्यान पंतप्रधानांनी महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकाशीदेखील संवाद साधला.
पराभवानंतरही पंतप्रधानांनी दिले प्रोत्साहन
विशेष म्हणजे भारतीय महिला हॉकी संघाच्या पराभवानंतरही राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह देशातील अनेक दिग्गजांनी संघाचे अभिनंदन केले. एका ट्विटमध्ये पंतप्रधानांनी म्हटले की, “ऑलिम्पिक खेळांमध्ये भारतीय खेळाडूंच्या अथक प्रयत्नांमुळे आम्ही सर्व भारावून गेलो आहोत. आमच्या मुला-मुलींनी दाखवलेली इच्छाशक्ती, विशेषतः हॉकीमध्ये, जिंकण्याचा उत्साह वर्तमान आणि भावी पिढ्यांसाठी मोठी प्रेरणा आहे.
आम्हाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
त्याचबरोबर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी म्हटले की, भारतीय महिला हॉकी संघाने मैदानावर चमकदार कामगिरी करून देशातील प्रत्येक नागरिकाची मने जिंकली आहेत. कोविंद म्हणाले, ‘आम्हाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे. राष्ट्रपतींनी ट्विट केले, ‘भारतीय महिला हॉकी संघाने मैदानावर त्यांच्या चमकदार कामगिरीने भारतातील प्रत्येक नागरिकाची मने जिंकली.’
Indian Womens Hockey Team Breaks Down During Telephonic Conversation With Prime Minister Narendra Modi
महत्त्वाच्या बातम्या
- Rahul Gandhi Poetry On Farmers : राहुल गांधींची शेतकऱ्यांसाठी कविता, ‘पीएम हमारे दो के, फिर किसान का क्या?’
- Reliance Future Deal : रिलायन्स-फ्युचर ग्रुप डीलला सर्वोच्च धक्का, सर्वोच्च न्यायालयाने अॅमेझॉनच्या बाजूने दिला निकाल, वाचा सविस्तर..
- मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तीन ठिकाणांवर पुन्हा ईडीची छापेमारी, नागपुरात सकाळपासून शोधमोहीम
- RBI Monetary Policy : आरबीआयच्या व्याजदरात कोणताही बदल नाही, जीडीपी वाढीचा दर 9.5 टक्के
- Tokyo Olympics : भारताला गोल्फमध्ये गोल्ड मिळण्याची आशा, असे झाल्यास अदिती अशोक करणार सुवर्णपदकाची कमाई