• Download App
    कोरोना काळातही भारतीय रेल्वेला 'अच्छे दिन ' ; भंगार वस्तू विकून ४५७५ कोटी रुपयांचे उत्पन्न indian railways earned 4575 crore rupees by scraps sale railway answered in rti

    WATCH : कोरोना काळातही भारतीय रेल्वेला ‘अच्छे दिन ‘ ; भंगार वस्तू विकून ४५७५ कोटी रुपयांचे उत्पन्न

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोना काळातही भारतीय रेल्वेला अच्छे दिन आले आहेत. वर्षभरात तब्बल ४५७५ कोटी कमावले आहेत. रेल्वेने भंगारात काढलेल्या वस्तुंची विक्री करुन हे मोठे उत्पन्न मिळवले आहे. माहिती अधिकारा अंतर्गत ही बाब उघड झाली आहे. indian railways earned 4575 crore rupees by scraps sale railway answered in rti

    कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेल्वेची प्रवासी वाहतूक बंदच आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेचं मोठे नुकसान झाले आहे. त्यावर उपाय म्हणून रेल्वेने भांगर विकून त्यातून उत्पन्न प्राप्त केले आहे.

    माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, २०२०- २१ या वर्षात भारतीय रेल्वेने भंगार विक्रीतून तब्बल ४५७५ कोटी रुपये कमावले आहेत. ही भंगार विक्रीतून झालेली आतापर्यंतची सर्वात मोठी कमाई आहे. यापूर्वी २०१०- ११ मध्ये रेल्वेने भंगार विकून ४४०९ कोटी रुपये मिळवले होते.
    भंगारात काढलेल्या वस्तूंमध्ये जुने रुळ, साचे, जुने इंजिन, डब्बे याचा समावेश आहे. सध्या अनेक मार्गांवर रेल्वेकडून विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे जुन्या इंजिनांमध्ये बदल करावे लागतात. या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात भंगार निघते.

    रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भंगार विक्रीचा व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी ही लिलावप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडली. रेल्वे खात्याने २०२१-२२ या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून ४१०० कोटी रुपये उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ” २०२०-२१ या आर्थिक वर्षात रेल्वे बोर्डाच्या ४००० कोटींच्या उद्दिष्टाच्या तुलनेत रेल्वेने भंगारातून ४५७५ कोटी रुपये जमा केले. भंगार विक्रीतून भारतीय रेल्वेने आतापर्यंतची सर्वाधिक कमाई केली होती. हे लक्ष्य निर्धारित लक्ष्यापेक्षा सुमारे १४ टक्के अधिक आहे आणि गेल्या आर्थिक वर्षातील भंगार विक्रीच्या आकड्यांपेक्षा पाच टक्क्यांनी जास्त आहे” अशी माहिती रेल्वे प्रवक्त्यांनी दिली आहे.

    आरटीआय कायद्यांतर्गत मध्य प्रदेशमधील चंद्रशेखर गौर यांनी माहिती मागितली होती. त्यावर रेल्वे बोर्डाने म्हटले आहे की, कोरोनाच्या साथीने २०२०-२१ मध्ये त्रस्त झालेल्या रेल्वेने गेल्या वर्षाच्या तुलनेत भंगारातून यावेळी पाच टक्के अधिक उत्पन्न मिळवले आहे. २०१९-२० मध्ये ४३३३ कोटी रुपयांच्या भंगार वस्तूंची विक्री झाली आणि २०२०-२१ मध्ये भंगारातून तब्बल ४५७५ कोटी रुपये मिळाल्याचं रेल्वेने म्हटलं आहे. तसेच २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी भंगार विक्रीतून रेल्वे बोर्डाने ४१०० कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

    indian railways earned 4575 crore rupees by scraps sale railway answered in rti

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??