वृत्तसंस्था
नवी दिल्ली – लडाखच्या गलवान व्हॅलीतील भारत – चीन हिंसक संघऱ्षाला एक वर्ष पूर्ण होताना भारतीय लष्कराने आपल्या अमर शहीद जवानांना एक स्फूर्तिगीत समर्पित करून अनोखी श्रध्दांजली वाहिली आहे. Indian Army releases a video on the first anniversary of the Galwan Valley
भारत मा के अमर सपूत है गलवान के वीर हे या गीताचे शीर्षक असून ते गलवान संघर्षात शहीद झालेल्या जवानांना समर्पित केले आहे. “ मुझे तोड़ लेना वनमाली! उस पथ पर देना तुम फेंक, मातृभूमि पर शीश चढ़ाने जिस पथ जावें वीर अनेक” असेही या गीताचे बोल आहेत.
प्रत्यक्ष गलवान व्हॅली आणि आपल्या जवानांवर हे गीत चित्रीत करण्यात आले असून ते सुगता गुहा यांनी लिहिले आहे. विक्रम घोष यांनी संगीतबध्द केले आहे, तर दक्षिणेतला सुपरस्टार गायक हरिहरन आणि टीमने गायले आहे.