- भारत आणि पाकिस्तान या बहुचर्चित सामन्याला दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. भारतीय संघाचा हा यंदाच्या टी -20 विश्वचषकातील पहिलाच सामना आहे.
विशेष प्रतिनिधी
दुबई: टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडिया आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडत आहे. या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. पण भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा हा शून्यावर बाद झाला. शाहीन आफ्रिदीच्या एका शानदार चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. तर त्यानंतर अवघ्या 3 रन्सवर सलामीवीर केएल राहुल देखील बाद झाला.India vs Pakistan T20 world cup 2021 LIVE Score
पाकिस्तानसोबतच्या या सामन्यात टीम इंडियाच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कारण नुकताच भारताला तिसरा धक्का बसला आहे. सुरुवातीला चांगली फटकेबाजी करणारा सूर्यकुमार यादव हा 11 रन्स करुन बाद झाला.
LIVE UPDATE:
- भारताला तिसरा धक्का, सूर्यकुमार यादव 11 रन्सवर बाद
भारताच्या फलंदाजीचा अर्धा डाव समाप्त
भारतीय फलंदाजानी 10 ओव्हर खेळून झाल्या आहेत. भारताचे 3 गडी बाद झाले असून 60 धावा झाल्या आहेत.
India vs Pakistan T20 world cup 2021 LIVE Score: