दुबईच्या अबू धाबी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज टी-20 विश्वचषक सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्धचा विक्रम अतुलनीय आहे.
विशेष प्रतिनिधी
दुबई: टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडिया आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडत आहे. या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. पण भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली मात्र कॅॅॅप्टन कोहलीने एकाकी झुंज देत भारताला १५१ धावांवर पोहचवले.India vs Pakistan Live Score, T20 World Cup 2021: Virat Kohli, Rishabh Pant take India 151/7
अत्यंत खराब सुरुवात होऊनही भारताने कमबॅक करत 151 धावा स्कोरबोर्डवर लगावल्या आहेत. यामध्ये कर्णधार कोहलीने एकहाती झुंज देत 49 चेंडूत 57 तर पंतने 39 धावा करत थो़डा डाव सावरला. पाकिस्तानच्या शाहीनने सर्व महत्त्वाचे विकेट घेतले. यात रोहित शर्मा, सूर्याकुमार आणि विराट यांचा समावेश आहे. पाकिस्तानसमोर असलेल्या 152 धावांच टार्गेट ते पूर्ण करतात का हे आता पाहावं लागेल.
IND vs PAK Live Score: विराट कोहलीचं दमदार अर्धशतक!
विराट कोहलीने झळकावलं अर्धशतक, 45 चेंडूत 50 धावा
भारतीय संघ अडचणीत असताना कर्णधार विराटची झुंजार खेळी
भारताकडून पाकिस्तानसमोर विजयासाठी 152 धावांचं आव्हान
IND vs PAK Live Score: 19 षटकांनंतर भारताची धावसंख्या सहा गडी गमावून 138 धावा होती. शाहीन आफ्रिदीच्या या षटकात भारताने 11 धावा केल्या. या षटकात विराट कोहलीची विकेटही आली. शेवटच्या चेंडूवर आफ्रिदीच्या चुकीच्या थ्रोमुळे भारताला पाच धावा मिळाल्या.