एखाद्याचे शरीर जर सुदृढ असेल स्नायू पिळदार असतील तर त्या व्यक्तीची समोरच्या लोकांवर पटकन छाप पडते. व्यक्तीमत्व खुलवण्यासाठी याचा लाभ होतोच. पण त्यासाठी काही बाबी करणे आवश्यक असते. दररोजच्या आहारात आवश्यक प्रथिनांचा समावेश केल्यास स्नायूंचे वजन आणि ताकद कायम ठेवता येते.Increase the amount of protein in the diet for body fat
तुमची चालत राहण्याची क्षमता कायम ठेवण्यासाठी व पडल्यानंतर होणाऱ्या इजांची तीव्रता कमी करण्यासाठी स्नायू सुदृढ असणे आवश्यक ठरते. यासाठी वयोवृद्ध लोकांनी आहारात प्रथिनांचा परिणामकारक वापर करणे आवश्यक ठरते.
उच्च दर्जाच्या प्रथिनांचा आहार, म्हणजेच मांसाहाराचा आहारात समावेश अवश्य करावा. प्रथिने आपल्या हेल्दी डाएटमधील एक महत्त्वाचा भाग आहेत. ते आपल्या शरीरातील बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, ज्यांना अमिनो अॅसिड्स म्हणून ओळखले जाते. तुमचे शरीर अमिनो अॅसिड्सचा उपयोग करून स्नायू व हाडे विकसित आणि दुरुस्त करते. त्याप्रमाणे हार्मोन्स आणि एन्झाइम्सचे कार्य सुधारते. प्रथिनांचा उपयोग शरीरातील ऊर्जेचा स्रोत म्हणूनही केला जातो.
प्राणीजन्य उत्पादनांमध्ये जसे की, चिकन किंवा मासे आणि इतर डेअरी उत्पादने सर्वप्रकारचे आवश्यक अमिनो अॅसिड असतात आणि त्यांना संपूर्ण प्रथिने किंवा उच्च प्रतीची प्रथिने म्हणून ओळखले जाते. सोया उत्पादने, राजगिरा आणि राजगिऱ्याच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात अमिनो अॅसिड्स असतात. वनस्पतींपासून मिळणाऱ्या प्रथिनांमध्ये जसे की, बिन्स, मसूर, शेंगदाणे आणि न दळलेली धान्ये शरीरासाठी आवश्यक एखाद्या अमिनो अॅसिडचा अभाव असतो व त्यामुळे त्यांना अपूर्ण प्रथिने म्हणतात. पुरवणी आहारातून प्रथिने कसे मिळवाल.
एक चमचा पीनट बटर व एक सफरचंद आहारात घ्या. कोणत्याही प्रकारचे मीठ, साखर किंवा इतर घटक पदार्थांशिवायचे पीनट बटर घेणे योग्य. लो-फॅट पनीरमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असतात. ते अंडी, राजगिरा किंवा दह्यासोबत घ्यावे. शेंगदाणे आणि विविध बियांचा सलाड, भाज्या आणि विविध प्रकारच्या करींमध्ये केल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. हिरव्या सलाडवर भाजलेले बदाम घालून घ्या, खूप फायदा होतो. सोयाबीनचा उपयोग सूप, करी आणि पास्ता सॉसमध्ये फायद्याचा ठरतो.