• Download App
    गुजरातच्या हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या कंपनीवर प्राप्तिकर विभागाचे छापे, २३ ठिकाणी कारवाई ; कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा संशयIncome tax raids on Gujarat diamond company, action in 23 places; Suspicion of scam of crores

    गुजरातच्या हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या कंपनीवर प्राप्तिकर विभागाचे छापे, २३ ठिकाणी कारवाई ; कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा संशय

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : हिऱ्यांची निर्मिती -निर्यात करणाऱ्या गुजरातच्या कंपनीवर आज प्राप्तिकर विभागाने छापे टाकले असून एकाच वेळी कंपनीच्या २३ ठिकाणी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. या कंपनीने कोट्यवधी रुपयांची कर चोरी केल्याचे तसेच मोठा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे.Income tax raids on Gujarat diamond company, action in 23 places; Suspicion of scam of crores

    या कंपनीचे गुजरात येथील सुरत, नवसारी, मोरबी, वाकणकर (मोरबी) आणि महाराष्ट्रातील मुंबईत हिरे उत्पादनाचे व्यवसाय आहेत. छापेमारी सुरूच आहे.

    प्राथमिक तपासात असे आढळले आहे की, कंपनीने बेहिशेबी हिरे खरेदी केले असून लहान पॉलिश हिरे ५१८ कोटींना विकले आहेत. त्याशिवाय ९५ कोटींची हिरकणी विकून कमावले असून त्याचा हिशेब दाखविला नाही.

    कंपनीने वर्षानुवर्षे, सुमारे २ हजार ७४२ कोटी रुपयांच्या छोट्या हिऱ्यांच्या विक्रीचा हिशोब ठेवला आहे. पण, खरेदी रोख स्वरूपात केली. परंतु खरेदीची बिले स्थानिक विक्रेत्याकडून घेण्यात आली होती.
    छाप्यात १.९५ कोटींचे दागिने जप्त केले असून १० कोटी ९८ लाखांचे ८ हजार ९०० कॅरेटचे बेहिशेबी हिरे जप्त केले. कंपनीच्या अनेक लॉकरना सील ठोकले आहे.

    कंपनी ही कच्चे हिरे मोठया प्रमाणात आयात करते आणि हिऱ्यांचा पैलू पाडून आणि मोठे आकार देऊन हॉंगकॉंग येथे नोंदणीकृत कंपनीद्वारे विकण्याचा धंदा करते. हा व्यवसाय संपूर्णतः भारतातून हाताळला जातो. गेल्या दोन वर्षात कंपनीने १८९ कोटींचे हिरे आयात केले आणि त्यांना पैलू पाडून १ हजार ४० कोटींना त्याची विक्री केली. याशिवाय बांधकाम व्यवसायात कंपनी असून ८० कोटींची बेहिशेबी गुंतवणूक केली आहे.

    Income tax raids on Gujarat diamond company, action in 23 places; Suspicion of scam of crores

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…