वृत्तसंस्था
मुंबई : वसईत हळदी समारंभ रंगात आला होता. नाच सुरु असताना दोन गटांत बाचाबाची झाली आणि रंगाचा बेरंग होऊन तुफान हाणामारी झाली. अनेकांनी एकमेकला लाथा आणि बुक्क्यांनी तुडविले तसेच खुर्च्या फेकल्या. In vasai town Pre-weeding ceremony of Haladi got violent. particepent got angry while dancing and beat each other with Hand and Leg. Thrown chairs also.
वसई पूर्वेतील सकवार पाटीलपाडा येथील या घटनेमुळे खळबळ उडाली. करोनाकाळात लग्नसमारंभ साजरे करण्यावर निर्बंध आहेत. पण, मोठी गर्दी होती.
तुंबडा कुटुंबीयांतील सुनील तुंबडा याचे लग्नकार्य रविवारी (ता.१६ ) होते. लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीचा समारंभ होता. या कार्यक्रमाला शेकडोच्या संख्येने पाहुणे मंडळी आली होती. नागरिक नाचत होते. नाचताना काही जण मद्यधुंद स्थितीत होते. मध्यरात्रीनंतर नाचणाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली आणि याचं रूपांतर हाणामारीत झालं.
दरम्यान हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लग्नकार्यास २५ जणांची उपस्थिती व २ तासांची वेळ आहे. परंतु नियम पायदळी तुडविल्याचे दिसत आहे.
In vasai town Pre-weeding ceremony of Haladi got violent. particepent got angry while dancing and beat each other with Hand and Leg. Thrown chairs also.
महत्त्वाच्या बातम्या
- जगप्रसिद्ध स्पॅनिश चित्रकार पाब्लो पिकासोच्या चित्राची ७०० कोटीना विक्री ; न्यूयॉर्कमध्ये लिलाव
- Cyclone Tauktae : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवर एनडीआरएफ सतर्क, अनेक ठिकाणी मूसळधार पावसाची शक्यता
- वांद्रेमध्ये 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन आरोपींना अटक, 19 मेपर्यंत कोठडी
- Maratha Reservation Issue : राज्यात पांढऱ्या पायाचे सरकार आल्याने मराठा आरक्षण झाले रद्द ठाकरे- पवार सरकारवर सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका