प्रतिनिधी
बीड: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मावळातील पत्रकारांनी नवाब मलिक रोज भाजपवर टीका का करतात असा प्रश्न विचारला, याला उत्तर देत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यासारखे लोक मी खिशात ठेवतो, असं वक्तव्य केलं आहे. याच वक्तव्याला आता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले.
अशी भाषा चंद्रकांत पाटील यांना शोभत नाही. असे मुंडे यांनी म्हटलंय, तर चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत, किंवा भाजपच्या कुठल्याच राज्य किंवा केंद्रातील नेत्यांचे खिसे मोठे नसल्याचं म्हणत भाजपवर टीका केली. ज्यांनी त्यांनी भान ठेवून बोलायला पाहिजे, असे देखील यावेळी मुंडे म्हणाले आहेत.
–
– मलिकसारखे खिशात ठेवतो,बोलणे शोभत नाही
– चंद्रकात पाटील यांच्यावर मुंडे यांचा पलटवार
– चंद्रकांत पाटलांचे खिसे एवढे मोठे नाहीत
– बोलताना प्रत्येकाने भान ठेवण्याचा सल्ला