विशेष प्रतिनिधी
पुणे : शहरातील ससून हॉस्पिटलमधून ३ महिन्याच्या मुलीला नर्सच्या वेशभूषेत आलेल्या एका महिलेने वॉर्डातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मात्र, पोलिस आणि नागरिकांनी रिक्षाचा पाठलाग करून त्या महिलेला अटक केली. In the guise of a nurse in Pune The woman took the girl away
एक महिला दोन मुलींसह ससूनमध्ये उपचारासाठी आल्या होत्या. मोठ्या मुलीची सोनिग्राफी करण्यासाठी त्यांना मुलीला वार्डमध्ये घेऊन जायचे होते. त्यामुळे महिलेने रुग्णालयातील ओळखीच्या महिलेकडे तीन महिन्यांची मुलगी सांभाळण्यासाठी दिली होती.
त्यानंतर डॉक्टरांनी बोलविले असल्यामुळे महिलेला वार्डमध्ये जायचे होते. त्यावेळी नर्सच्या वेशात आलेल्या एका बाईने मुलीला माझ्याकडे द्या, तिची आई आल्यानंतर मी बाळाला त्यांच्याकडे देते, असे सांगून मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्या महिलेने बाळाचे अपहरण करून रिक्षातून पळ काढला. दरम्यान, महिलेला मुलगी दिसली नाही.
तिने सुरक्षा रक्षकला विचारले असता, एक महिला बाळाला घेऊन गेल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर बंडगार्डन पोलीस आणि नागरिकांनी रिक्षातून पाठलाग करून चंदननगर परिसरात महिलेला ताब्यात घेतले आहे.
- – पुण्यात नर्सच्या वेषामधील महिलेने मुलीला पळवले
- – ससून रुग्णालयातील घटना, बायांनो मुले सांभाळा
- – आपली मुले दुसऱ्याला सांभाळायला देऊ नये
- – रिक्षातून पाठलाग करुन पकडले
- – नागरिक आणि पोलिस यांच्यामुळे अपहरण टाळले
- – ससूनची सुरक्षा यंत्रणा बळकट करण्याची गरज
In the guise of a nurse in Pune The woman took the girl away