विशेष प्रतिनिधी
सांगली/ कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापुरात पुरग्रस्ताच्या मदतीसाठी एनडीआरएफची पथके बचाव कार्यासाठी पोचली आहेत. In Sangli, Kolhapur Rescue operation started
सांगली शहरात एनडीआरएफची टीम दाखल झाली असून काल पाहिली टीम वाळवा तालुक्यात दाखल झाली होती, तर आज दुसरी एनडीआरएफची टीम सांगली शहरासाठी दाखल झाली.
कोल्हापुरातील आंबेवाडीत पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांची सुटका करण्याचे काम शनिवारी एनडीआरएफ पथकाकडून सुरु आहे.
- सांगली,कोल्हापुरात बचाव कार्य सुरु
- पुरग्रस्ताच्या मदतीसाठी एनडीआरएफची पथके
- सांगली शहरात आणि वाळवा तालुक्यात काम
- कोल्हापुरातील आंबेवाडीत पुरग्रस्ताची सुटका