वृत्तसंस्था
कोल्हापूर : जिल्ह्यातल्या पट्टणकोडोली याठिकाणी विठ्ठल-बिरदेव यात्रा उत्साहात पार पडली.In Pattankodoli Vitthal-Birdev Yatra
देशभरातील लाखो भाविक याठिकाणी देवाचं दर्शन घेण्यासाठी येतात. भंडाऱ्याची उधळण करत बिरोबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष केला जातो… गेल्या वर्षी कोरोना संकट जास्त असल्यामुळे भाविकांना परवानगी नाकारली होती. मात्र यावेळी काही प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.
फरांडे बाबा यांची भाकणूक ऐकण्यासाठी खूप मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यावेळी भाकणुकीमध्ये फरांडे बाबा यांनी पाऊस पाणी चांगलं होईल.आणि कडधान्य महाग होईल, अशी भाकणूक केली आहे.
– पट्टणकोडोलीमध्ये विठ्ठल-बिरदेव यात्रा उत्साहात
– गेल्या वर्षी कोरोनामुळे भाविकांना परवानगी नव्हती
– भंडाऱ्याची उधळण, बिरोबाच्या नावानं चांगभलं
– फरांदे बाबा यांची भाकणूक ऐकण्यासाठी भाविक