• Download App
    पावसाळ्यात 18 दिवस समुद्राला उधाण ! 26 जून रोजी सर्वात उंच लाटा ; जुलै-ऑगस्टमध्येही समुद्र खवळणार In Monsoon sea will be Rough For 18 days ! , The highest waves on June 26; The sea will also be rough in July-August also

    पावसाळ्यात १८ दिवस समुद्राला उधाण ! २६ जून रोजी सर्वात उंच लाटा ; जुलै-ऑगस्टमध्येही समुद्र खवळणार

    वृत्तसंस्था

    मुंबई : पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस उरलेले आहेत. या वर्षी पावसाळ्यात समुद्राला 18 दिवस मोठे उधाण येणार आहे, असा इशारा पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिला. In Monsoon sea will be Rough For 18 days ! , The highest waves on June 26; The sea will also be rough in July-August also

    जुलै-ऑगस्ट महिन्यात समुद्रात तब्बल 10 दिवस साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे या दिवसांत मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



    मुंबईत समुद्राला उधाण असताना प्रचंड उंच लाट किनाऱ्यावर आदळत असतात. साधारणतः साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटांपासून धोका होऊ शकतो. अतिवृष्टी झाल्यास पावसाचे पाणी समुद्रात जाण्यापासून रोखले गेल्याने पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे असे उधाणाचे दिवस पालिकेकडून जाहीर केले जातत. या उधाणांच्या दिवशी मुंबईकर-पर्यटकांनी किनाऱ्यावर काळजी घ्यावी, शक्यतो जाणे टाळावे, असे आवाहन केले जाते. उधाणाच्या दिवशी सर्व किनाऱ्यांवर पालिकेसह पोलिसांचा चोख बंदोबस्तही ठेवण्यात येतो. शिवाय सुरक्षा यंत्रणाही तैनात ठेवण्यात येत असते.

    26 जून रोजी सर्वात उंच लाटा

    पावसाची सुरुवात असणाऱ्या जून महिन्यात 23 ते 28 जून असे सलग सहा दिवस समुद्राला उधाण येणार आहे. यावेळी साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. शुक्रवार, 26 जून रोजी या वर्षातील सर्वात मोठी भरती येणार असून सर्वात उंच म्हणजे 4.85 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. तर 8 सप्टेंबर रोजी 12.48 वाजता 4.56 मीटर उंचीच्या तर 9 सप्टेंबर रोजी 13.21 वा. 4.54 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

    In Monsoon sea will be Rough For 18 days ! , The highest waves on June 26; The sea will also be rough in July-August also

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…