पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवतीदेखील फिरत असते. त्यामुळे पृथ्वीच्या एका भागात उजेड तर एका भागात अंधार असतो. त्यालाच आपण दिवस व रात्र म्हणतो. पृथ्वीचा आस तिच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेच्या पातळीशी काही अंशात कललेला असल्याने ऋतूमानात फरक पडतो.In many parts of the world, the sun shines even at midnight
विषुववृत्ताजवळ असणाऱ्या लोकांना हा फरक तितकासा जाणवणारा नसला तरी विषुववृत्तापासून दूर असणाऱ्यांना मात्र जाणवतो. आपण जसजसे उत्तरेकडे जातो तेव्हा दिवसाचा कालावधी मोठा होत जातो.
भारताचा विचार केल्यास आपल्याकडे बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असे दिसते. जून महिन्यात दिवस सर्वात मोठा असतो. कित्येक युरोपिय देशात उन्हाळ्याचा दिवस सतरा ते अठरा तासांचाही असू शकतो.
मात्र काही ठिकाणी दिवस यापेक्षाही फार मोठा असू शकतो. कारण युरोपच्या अधिक उत्तरेकडे सरकल्यास म्हणजे आर्क्टिक भागात चक्क मध्यरात्रीही सुर्य समोर उभा ठाकलेला असतो. त्यामुळेच या प्रकाराला मध्यरात्रीचा सुर्य म्हणतात. म्हणजे तेथे चक्क रात्री बाराला देखील लख्ख सूर्यप्रकाश पहायला व अनुभवायला मिळतो. हिच परिस्थिती दक्षिण गोलार्धात दक्षिण ध्रृवाजवळ असते.
कॅनडातील युकॅन, ग्रीनलॅंड, फिनलॅंडचा काही भाग, नॉर्वेचा काही भाग, रशिया चा काही भाग, स्वीडनचा काही भाग, अलास्का, आईसलॅंड येथे मध्यरात्रीचा सुर्य अनुभवायला मिळतो. फिनलॅंडसारख्या भागात तर सलग ७३ दिवस सुर्य असतोच, मावळत नाही. मात्र या भागात हिवाळ्यात मात्र इतकेच दिवस सुर्य दिसतही नाही. याहीपेक्षा उत्तर आणि दक्षिण ध्रुव इथं हिवाळ्यात २४ तासाची रात्र तर उन्हाळ्यात २४ तासांचा दिवस असतो.
म्हणजे आपल्यापेक्षा चक्क दुप्पट मोठा दिवस व रात्र असे चित्र अनुभवायला मिळते. यालाच भूगोल विषयाच्या भाषेत पोलर डे किंवा ध्रुवीय दिवस असे म्हणतात.
In many parts of the world, the sun shines even at midnight