• Download App
    यश- अपयशापेक्षा ध्येय गाठण्याकडे लक्ष द्या, डॉ. मोहन भागवत यांचा सल्ला; कोरोनाविरोधातील लढा सामूहिक प्रयत्नाने जिंकण्याचा निर्धार In Life Success - Failure are Coming and Going. Focus on Achieving Goals, : Dr. Mohan Bhagwat

    हम जितेंगे – Positivity Unlimited : यश- अपयशापेक्षा ध्येय गाठण्याकडे लक्ष द्या, डॉ. मोहन भागवत यांचा सल्ला; कोरोनाविरोधातील लढा सामूहिक प्रयत्नाने जिंकण्याचा निर्धार

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जीवनात यश-अपयशाचा खेळ सुरूच असतो. पण, धैर्याने ध्येय प्राप्त होईपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करणे महत्वाचे आहे. कोरोनाविरोधी लढा भारत सामूहिक प्रयत्नाने जिंकेल, असा दृढविश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला. In Life Success – Failure are Coming and Going. Focus on Achieving Goals, : Dr. Mohan Bhagwat

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजात सकारात्मकता वाढीस लागावी, या उद्देशाने ‘हम जितेंगे – Positivity Unlimited ‘ या ऑनलाइन व्याख्यानमालेचे पाचवे आणि अखेरचे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

    दिल्ली येथील कोव्हिड रिस्पोन्स टीमच्या पुढाकाराने अक्षय्य तृतीये निमित्त 11 ते 15 मे पर्यंत व्याख्यानमाला आयोजित केली होती.

    डॉ. मोहन भागवत यांनी सामाजिक, आर्थिक आणि जागतिक पातळीवरील घडामोडींचा आढावा यावेळी घेतला.

    डॉ. मोहन भागवत म्हणाले..

    1 ) देशाने यापूर्वी प्लेगसारख्या साथीचा सामना केला आहे. प्रथम सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार यांनी तर रुग्णसेवा करणारे माता- पिता अल्पवयात गमावले होते. अशा कठीण प्रसंगाला त्यांनी धैर्याने तोंड दिले. त्यामुळे आज संघ सामाजिक कार्यात आघाडी घेऊ शकला. तशा धैर्याची, समाजाप्रती असलेल्या स्नेहाची आज समाजाला गरज आहे.

    2)जीवन- जरा- मरण कोणालाही सुटलेले नाही, अशा ठाम विचाराने चालणारी भारतीय संस्कृती आहे. युद्धजन्य परिस्थितीत विजय आपलाच होणार आहे, हे समजून जो वाटचाल करतो तो जिंकतो. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन रसातळाला आणि बेचिराख झाले तरी आम्ही हरणार नाही, अशी पाटीच ब्रिटनचे पंतप्रधान विल्सन चर्चिल यांनी कार्यालयात लावली होती. अखेर या दृढसंकल्पामुळे ब्रिटनचा विजय झाला.

    3 )कोरोनाची पहिली लाट येताच आपण गोंधळून गेलो. दुसऱ्या लाटेत संसर्ग वाढला. तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना समुद्राच्या लाटेत पर्वताप्रमाणे दृढ राहण्याची ताकद निर्माण आतापासून केली पाहिजे. देव- दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून हलाहल विष आणि रत्ने निघाली. रत्नांकडे देव आणि दानव आकृष्ट झाले नाहीत. त्यांनी अमृत काढण्याचे प्रयत्न सुरु ठेवले होते. त्याच प्रयत्नांची सध्या गरज आहे.

    4 ) उद्योगपती आजीम प्रेमजी यांनी त्यांच्या व्याख्यानात साथ आटोक्यात आणण्यासाठी वेगवान कृती करण्याचा सल्ला दिला होता. त्याचा उल्लेख करून भागवत म्हणाले, सामूहिक काम केले तर वेगाने काम करता येईल. टीमद्वारे मागील बॅकलॉग भरून काढता येईल. वैयक्तिक मतभेद, दोष प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही. आधी संकटांचा एकजुटीने सामना करून त्यावर विजय मिळवू.

    5 ) कोरोनाच्या या लढ्यात आपल्या प्रकृतीला जपा, संकल्प, दृढता, प्रयत्न आणि धीराने काम करण्याची वृत्ती जोपासली पाहिजे.

    6) सतत जागृत राहून काम केले पाहिजे. तसेच सक्रिय राहिले पाहिजे. व्यायाम, प्राणायाम, ओंकार,दीर्घ श्वसन याचा अभ्यास केला पाहिजे. सूर्यनमस्कार हे अशावेळी प्रभावी आहेत.

    7) आहार, विहार, स्वच्छता याकडे काटेकोर लक्ष देण्याबरोबर सामाजिक अंतर, मास्कचा वापर अतिआवश्यक आहे.

    8 )वैज्ञानिक दृष्टिकोन अशा वेळी महत्वाचा आहे. जुन्या आणि नव्या गोष्टींची सांगड घालून उपचार घ्या. पण, ते विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरत आहेत की नाहीत ,हे प्रथम पारखून घ्या.

    9) लॉकडाऊनमुळे तुम्हाला कुटुंबासह एकत्र राहण्याची संधी मिळाली आहे. नवीन गोष्टी शिका, मुलांसमवेत वेळ घालावा आणि संवाद वाढवून प्रेम वृद्धिंगत करा.

    10 )कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने अनेक जण समाज काय म्हणेल म्हणून डॉक्टरांकडून उपचार करून घेत नाहीत. रुग्णालयात भीतीने भरती होत नाहीत. असे कृपया करू नका. काही जण कोरोनाच्या भीतीने बेड अडवून बसतात. असे करणेही चुकीचे आहे. त्यामुळे तुम्ही गरजवंतावर अन्याय करता.

    11 ) सामाजिक कार्य करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. रुग्णसेवा, ऑक्सिजन पुरवठा, भोजन व्यवस्था अशी कामे तुम्हाला करता येतील. जनप्रबोधन आणि जनप्रशिक्षण करण्याची संधी आहे.

    12 ) गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्याच्या शिक्षणाचे नुकसान झाले. परंतु, ज्ञानात मुले मागे पडणार नाहीत. याची काळजी घ्या.

    13 ) अनेकांनी रोजगार गमावले आहेत.त्यांच्याकडे लक्ष द्या. देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग मंदावला आहे. त्याला गती देण्याची गरज आहे. कौशल्य असलेल्या व्यक्तीकडून साहित्य खरेदी करा. उदा. उन्हाळ्यात गार पाणी पिण्यासाठी मातीचा माठ आवश्य खरेदी करून अशा रोजगाराला चालना द्या.

    In Life Success – Failure are Coming and Going. Focus on Achieving Goals, : Dr. Mohan Bhagwat

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…