• Download App
    बिहारमध्ये व्हाईट फंगसचे रुग्ण आढळल्याने उडाली खळबळ In Bihar After Black Fungus There are White Fungus infected patient Found

    बिहारमध्ये व्हाईट फंगसचे रुग्ण आढळल्याने उडाली खळबळ

    वृत्तसंस्था

    पाटणा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढले. त्यानंतर ब्लॅक फंगसचे (म्युकरमायकोसिस) संकट सुरु असताना बिहारमध्ये व्हाईट फंगसचे रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. In Bihar After Black Fungus There are White Fungus infected patient Found

    हा आजार ब्लॅक फंगसपेक्षा अधिक धोकादायक असून त्याचा फुफ्फुसांमध्ये संसर्ग होत आहे. त्वचा, नखं, तोंडाच्या आतील भाग, आतडे, किडणी, प्रायव्हेट पार्ट आणि मेंदू अशा सर्वच अवयवांवर परिणाम करत असल्याचे समोर आलं आहे.



    पाटण्याच्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं होती. त्यांच्या चाचण्या झाल्या. पण ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले नाहीत. कोरोनाच्या औषधांचाही त्यांच्यावर परिणाम होत नव्हता. तअधिक तपासण्यानंतर हा व्हाईट फंगसचा प्रकार असल्याचं समोर आलं. त्यानंतर अँटिफंगल औषधानं हे रुग्ण बरे झाले. या आजाराचं निदान कठीण आहे. पण अनेक रिपोर्ट निगेटिव्ह येतात. पण कोरोनासारखी लक्षणं आणि कफमुळं निघणाऱ्या द्रवाच्या तपासणीतून याचं निदान होतं.

    रोग प्रतिकारशक्तीची कमतरता हे आजाराचे प्रमुख कारण असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. तसंच मधुमेह असणाऱ्यांना आणि अँटिबायोटिक किंवा स्टेरॉईड दीर्घकाळ घेणाऱ्यांनाही याचा धोका आहे. कॅन्सरच्या रुग्णांनाही या फंगसपासून धोका आहे. नवजात बाळांमध्ये हा आजार डायपर कँडिडोसिस म्हणून समोर येतो.

    In Bihar After Black Fungus There are White Fungus infected patient Found

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…