वृत्तसंस्था
अमरावती : हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. यानुसार आज अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात व चांदुरबाजार तालुक्यातील गारपिटीसह जोरदार वादळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
या पावसामुळे शेतकरी राजा पुन्हा संकटात आला. शेतकऱ्यांच्या तूर, कपाशी, पिकासह पालेभाज्यांचा देखील नुकसान झालं आहे. काढणीला आलेल्या तूरी पावसात भिजून गेल्यात. पुढील दोन दिवस विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस व गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी राजा पुन्हा संकटात सापडला आहे.
- अमरावती जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस
- हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा
- मोर्शी व चांदुरबाजार तालुक्यात गारपिटीसह सरी
- तूर, कपाशीसह पालेभाज्यांच देखील नुकसान
- काढणीला आलेल्या तूरी पावसात भिजली