• Download App
    Important News : खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात ; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी ; वाचा सविस्तर Important News : 15% reduction in private school fees; Cabinet meeting approves

    Important News : खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात ; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी ; वाचा सविस्तर

    • मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाला मंजुरी

    • खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के फी कपात

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या १५ टक्के फी कपातीला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के फी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली.Important News : 15% reduction in private school fees; Cabinet meeting approves

     

    पालकांनी शाळांची फी 85 टक्के भरावी, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. पालकांना मोठ्या प्रमाणात आशा होती, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना नक्कीच दिलासा मिळेल.

    15 टक्के फी कपातीचा अध्यादेश लवकरच काढला जाणार आहे.

    कोरोनाच्या स्थितीमुळे सध्या पालकांकडे फीसाठी तगादा लावण्यापेक्षा शाळेने फी भरण्याचं स्ट्रक्चरच असलं केलं पाहिजे जेणेकरून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. सध्याच्या घडीला ऑनलाईन शाळा असल्याने फीमध्ये 15 टक्के कपात केली गेली पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने सुचवलं होतं.

    अगोदरच फी भरलेल्या पालकांचं काय?

    या वर्षी 15 टक्के फी माफ करण्यात आली आहे. यासदंदर्भात आज निर्णय घेण्यात आला आहे. पालकांनी 85 टक्के फी भरावी असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

    ज्या शाळा निर्णय मान्य करणार नाहीत त्याचं काय?

    हा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलेला आहे. सुप्रीम कोर्टात यासंदर्भात केस सुरु आहे. कोर्टानं राज्याला निर्णय घेऊन अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. ज्या शाळा यानंतरही निर्णय मान्य करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

    ज्या शाळा विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून शिक्षणापासून वंचित ठेवतात. सरकारच्या निर्णयाला दाद देत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु आहे.

     

    Important News : 15% reduction in private school fees; Cabinet meeting approves

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस