जागतिक तापमान वाढ हा सध्या कळीचा प्रश्न बनलेला आहे. ही तापमान वाढ डोळ्याला दिसत नसली तरी त्याचे परिणाम जगाच्या साऱ्या कानाकोपऱ्यात दिसत आहेत. तापमान वाढीचा फटका न बसलेला पृथीवरील कोणताही खंड नाही. या तापनावाढीमुळे हिमनग कोसळथ आहेत, समुद्राची पातळी वाढत आहे, पाउसमान बदलत आहे. त्यामुळे दरवेळी त्याचे वेगवेगळे परिणाम अनुभवायला मित आहे. Impact of global warming on antartica
जगातील सर्वांत मोठा हिमनग अंटार्क्टिका खंडापासून नुकताच विलग झाला आहे. अंटार्क्टिका खंडाच्या रॉनी आइस शेल्फ या भागापासून तुटून बाजूला झालेला हा हिमनग सध्या वेडल समुद्रात तरंगत आहे. ए-७६ असे नाव या हिमनगाला देण्यात आले असून त्याचा आकार ४,३२० चौरस किलोमीटर इतका प्रचंड आहे. कोपर्निकस सेंटिनेल-१ या उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रावरून हिमनगग तुटल्याची बाब उघडकीस आली.
या हिमनगाची लांबी १७० किलोमीटर असून रुंदी २५ किलोमीटर इतकी आहे. स्पेनच्या माजोर्का या बेटापेक्षाही हा हिमनग मोठा आहे. या हिमनगाचा आकार पाहता तो ए-२३ ए या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या हिमनगापेक्षाही मोठा असल्याचे सिद्ध होत आहे. या हिमनगाचा आकार ३,८८० चौरस किमी इतका असल्याचे युरोपीय अवकाश संस्थेने सांगितले आहे. हा हिमनगही वेडल समुद्रातच आहे.
फेब्रुवारी महिन्यात अंटार्क्टिका खंडाच्या ब्रंट आइस शेल्फ भागापासून ‘ए-७४’ हा हिमनग तुटून बाजूला झाला होता. त्याचा आकार १,२७० चौरस किमी इतका होता. पर्यावरण बदलामुळे तापमानात वाढ होत असून त्यामुळेच हिमनग तुटून बाजूला होत असल्याचा अंदाज पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जगात अशाच प्रकारे तापमान वाढ होत राहिली तर त्याचे गंभीर परिणाम समस्त मानवजातीप्रमाणेच जगातील सर्व प्राणीसृष्टीला भोगावे लागणार आहेत. त्यामुळे मानवाने केलेल्या चुकांची शिक्षा सर्वच प्राणीमात्रांना भोगावी लागत आहे. तसेच भोगावी लागणारही आहे.
Impact of global warming on antartica