• Download App
    कृषी कायदे काळाशी सुसंगत आर्थिक भरभराट करणारेच | The Focus India

    कृषी कायदे काळाशी सुसंगत आर्थिक भरभराट करणारेच

    • नाणेनिधीच्या गीता गोपीनाथ यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कृषी आणि कामगार कायदे आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने योग्य दिशेने उचलली पावले आहेत, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनी व्यक्त केले. त्यांनी स्पष्ट केलेले काही मुद्दे –

    • गतीमान अर्थव्यवस्थेसाठी ग्रामीण भागात गुंतवणूक वाढवली पाहिजे. त्याद्वारे गरीब आणि मजुरांचे पलायन शहराकडे रोखता येईल. कृषी आणि कामगार कायद्यामळे रोजगाराच्या संधी वाढतील. शेतमाल मागणी वाढल्याने पुरवठा साखळी मजबूत होईल.

    IMF geeta gopinath comes in support of new farm bills

    • कोरोना लॉकडाऊन काळात सुरु केलेल्या योजना सुरूच ठेवण्याचा सल्ला. दिवाळखोरी रोखण्याचे उपाय, निश्चित कर्ज आणि पतपुरवठा. आर्थिक दुर्बलांना रोख रक्कम, अशा योजनांचा समावेश आहे.
    • आर्थिक पुनर्प्राप्तीसाठी देशांनी कमाई करावी, या कल्पनेलाही माझा नकार आहे. कारण यामुळे बाजारातील आत्मविश्वास कमी होतो. नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांनी कोरोना साथीत काही कॉर्पोरेट कर्ज वाढ कलेची आहे, हि चिंतेची बाब आहे.
    • भारताच्या आत्मानिर्भर भारत मुद्यावर गोपीनाथ म्हणाल्या की, देश जर पुरवठा शृंखलाचा भाग झाला तरच तो यशस्वी निर्यातदार होऊ शकतो. लॉकडाऊनमध्ये गरीब आणि मजुरांना मोफत अन्नपाणी देण्याची व्यवस्था केली.

    • आयएमएफने म्हटले आहे की 2010 – 2021 आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 10.3 टक्क्यांनी घसरेल. कारण देश हळूहळू कोरोनाच्या लॉकडाऊनमधून बाहेर पडत आहे.

    IMF geeta gopinath comes in support of new farm bills

    • आयएमएफने अंदाज व्यक्त केला आहे की भारतीय अर्थव्यवस्था पुढील आर्थिक वर्षात 8.8 टक्क्यांनी वाढीसह प्रभावी पुनर्प्राप्ती करेल. जी जूनच्या जागतिक आर्थिक दृष्टिकोनातून वर्तवलेल्या 6 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…