Thursday, 8 May 2025
  • Download App
    राणेंनी तुमच्या गुपितांचा फुगा फोडला तर.. ; गोपीचंद पडळकर यांचा संजय राऊतांवर पलटवार If Narayan Rane bursts your secrets of balloon than what will happen : Gopichand Padalkar asked to Sanjay Raaut

    राणेंनी तुमच्या गुपितांचा फुगा फोडला तर.. ; गोपीचंद पडळकर यांचा संजय राऊतांवर पलटवार

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : हुजरेगिरीमुळे बावचळलेले राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरत आहेत ? असे तर नाही की राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपितांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल.

    राणे साहेबांवरील सुडाची कारवाई म्हणजे कायद्याची कारवाई, असे संबोधता मग पोलिसांना त्यांच्या आई बहिणीवरून अत्यंत घाणरेड्या शब्दात शिव्या घालणाऱ्या वरूण देसाईला अटक का होत नाही? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल…?

    ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसी विचारांचा विरोध केला आणि शरद पवारांचे नेहमी मार्मिक शब्दाने पितळ उघड पाडले पण तुम्ही आज त्यांचाच उदोउदो करणे म्हणजे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार नाही का?

    हिंदु समाजाला सडलेला म्हणणारा शर्जील उस्मान उजळ माथ्यानं महाराष्ट्रात येऊन फिरतो आणि त्यावर कारवाई करण्याऐवजी सत्तेच्या लालसेपोटी तुमचे हात थरथर कापतात. मला बाळासाहेबांच्या सामनाचे दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर करणाऱ्याला हेच विचारयेचे की त्यावेळेस यांची आस्मिता कुणाच्या पायापुढे लोटांगण घालते.

    माननीय संजय राऊत, कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहण्याची विकृतीला बांध घाला अन्यथा ‘तुमच्या हम करे सो’ कायद्याच्या फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील, असे ते म्हणाले.

    •  भोक पडलेल्या फुग्याला राऊत एवढे का घाबरतात ?
    •  नारायण राणेंनी तुमच्या गुपितांचा फुगा फोडला तर..
    •  तर तीन धन्यांची तुमच्यावर खप्पमर्जी होईल
    • शर्जील उस्मान उजळ माथ्यानं महाराष्ट्रात फिरतो
    •  सत्तेच्या लालसेपोटी कारवाई करताना हात थरथर कापतात
    •  ‘ तुमच्या हम करे सो’ कायद्याला आवर घाला
    • बाळासाहेबांच्या सामनाचे ‘बाबरनामा’त रूपांतर
    •  पवारांचं उदोउदो म्हणजे उदोउदो करणे म्हणजे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खपसणे

    If Narayan Rane bursts your secrets of balloon than what will happen : Gopichand Padalkar asked to Sanjay Raaut

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??